भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये त्याची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज (१४ जून) काळाच्या पडद्याआड गेला आहे. सुशांतने त्याच्या वांद्र्यातील राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी जीव गमावल्याने सुशांतबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
सुशांतने ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात हूबेहूब धोनीची भूमिका साकारत चाहत्यांची मने जिंकली होती. या संपूर्ण सिनेमात हिंदी बोलणाऱ्या सुशांतला त्याचे सर्व डायलॉग मराठी भाषेतही बोलावे लागणार होते. परंतु, असे घडले नाही.
कारण, हा सिनेमा प्रकाशित होण्यापुर्वी ही बातमी बाहेर गेली की, हा सिनेमा मराठीत डब करण्याचा विचार चालू आहे. एवढेच नाही तर, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने या सिनेमाचा मराठी व्हर्जन ट्रेलरही प्रकाशित केला होता.
परंतु, या सिनेमाला मराठीत डब करण्याच्या वृत्तामुळे राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनजे) हा पक्ष नाराज झाला होता. मनसेच्या चित्रपट शाखेने म्हटले होते की, “मराठीमध्ये डब केलेल्या सिनेमाला आम्ही प्रकाशित होऊ देणार नाही. जर हिंदी सिनेमा मराठीत डब करण्यात आला तर, मराठीतील मूळ सिनेमांसाठी प्रतिस्पर्धा निर्माण होईल. ज्याचा परिणाम मराठी सिनेमा निर्मात्यांना झेलावा लागू शकतो.”
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी म्हटले होते की, “निर्मात्याने हा पूर्ण सिनेमा मराठीत नव्याने बनवायला पाहिजे. पण, जर हा सिनेमा मराठीत डब करुन प्रकाशित करायचा असेल, तर आमचा या गोष्टीला विरोध आहे. आम्ही या सिनेमाचा विरोध करत नाही. पण, याच्या मराठी डबच्या निर्णयाला आमचा विरोध आहे.”
“जर, अशाप्रकारे हिंदी सिनेमे मराठीत डब करुन प्रकाशित करण्यात आले, तर मराठी सिनेसृष्टी संपुष्टात येईल. एका मराठी सिनेमावर ४००-५०० लोकांचे पोट अवलंबून असते. म्हणून हिंदी सिनेमाच्या या मराठीचे व्हर्जनला आम्ही विरोध करत आहोत. आम्ही सुरुवातीला या चित्रपटाच्या निर्मात्याला हात जोडून विनंती करत आहोत की, त्यांनी या सिनेमाचा मराठीचा डब प्रकाशित करु नये. यानंतरही जर त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही, तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलनास उतरु, असे खोपकर म्हणाले होते.
ज्याप्रकारे रितेशने एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा मराठी भाषेतील ट्रेलर लॉन्च केला होता. त्याप्रमाणेच अभिनेता आणि निर्माता धनुषनेही या सिनेमाचा तामिळ भाषेतील ट्रेलर आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे सर्वांसमोर आणला होता. शिवाय, तेलुगु सिनेमा स्टार नवीन बाबू म्हणजेच नानी यानेही एमएस धोनीच्या या बायोपिकचा तेलुगु ट्रेलर प्रदर्शित केला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
सुशांत सिंगच्या प्रश्नांना कंटाळून रागावला होता कॅप्टनकूल; म्हणाला होता, मी नंतर…
सुशांतने मुख्य भूमिका साकारलेल्या एमएस धोनीच्या बायोपिकने केली होती…