महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना खेळाची किती आवड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. राज ठाकरे हे सध्या नियमितपणे टेनिस खेळण्यासाठी जात आहेत. यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांचा टेनिस कोर्टवरील एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
राज ठाकरे यांचं टेनिसवरील प्रेम सध्या खूपच दिसून येत आहे. त्यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोत ते एकदम रुबाबदार लूकमध्ये दिसत आहेत. त्यांच्या हातात चहाचा कप, डोळ्यांवर गॉगल दिसत आहे.
राज ठाकरे यांचा फोटो मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
राज ठाकरे हे त्यांच्या भाषणशैलीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे यांचे काही दिवसांपूर्वी आपला मुलगा अमित ठाकरेसोबत शिवाजी पार्क जिमखान्यात टेनिस खेळतानाचे फोटो व्हायरल झाले होते.
वाचा-
-मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुलगा अमितमध्ये रंगला टेनिसचा सामना
-भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथनला इतिहास घडविण्याची संधी





