इंग्लंड संघाचा परफॉर्मेंस डायरेक्टर मोहम्मद बोबाट याला नवीन जबाबदारी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये बोबाट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासोबत क्रिकेट डायरेक्टरची भूमिका पार पाडणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याचा इंग्लंड संघासोबतचा करार संपणार आहे.
40 वर्षीय मोहम्मद बोबाट (Mohammed Bobat) मागच्या चार वर्षांपासून इंग्लंड संघासाठी काम करत आहे. 2019 साली वनडे विश्वचषक आणि 2022 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा तो भाग राहिला आहे. दरम्यानच्या चार वर्षात त्याने संघाची देखरेख चांगल्या प्रकारे केल्याचे पाहायला मिळते. इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम चांगले काम करत आहे. मॅक्युलमकडे ही जबाबदारी सोपवण्यात बोबाटची महत्वाची भूमिका राहिली आहे. तसेच बेन स्टोक्स याला कसोटी संघाचा कर्णदार बनवण्यात देखील त्याने महत्वाची भूमिका पार पाडली. 2016 पर्य़ांत इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघासाठी बोबाट काम करत होता. पण नंतर त्याला वरिष्ठ संघासोबत जोडले गेले. 2011 सालापासून त्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डासाठी आपली भूमिका चोख पार पाडली आहे.
RCB appoints Mo Bobat as the Director of Cricket for IPL. ????
Bobat has served England Cricket as their Performance Director since 2019, and has been a part of the ECB set up for 12 years, during which England lifted the T20I and ODI World Cups. ????
Bobat has also worked very… pic.twitter.com/Q61k6WgNPI
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 29, 2023
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबी आयपीएलमधील एक बलाढ्य संघ आहे. पण मागच्या 16 हंगामांमध्ये या संघाला एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आळी नाहीये. मागच्या आयपीएल हंगामात आरसीबी प्लेऑफसाठीही पात्र ठरली नाही. परिणामी मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. संघाने कारवाईच्या रुपात दोघांना या पदावरून बरखास्त केले.
काही आठवड्यांपूर्वी आरसीबीसाठी आगामी हंगामात एंडी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार, हे घोषित केले गेले. जिम्बाब्वेचा हा माजी क्रिकेटपटू मागच्या वर्षीपर्यंत लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी लखनऊची साथ सोडल्यानंतर जॉन्टीन लँगर लखनऊचे मुख्य प्रशिक्षक बनले. अशातच शुक्रवारी (29 सप्टेंबर) आरसीबीच्या डायरेक्टरपदी हेसनऐवजी मोहम्मद बोबाट ही जबाबादीर पार पाडणार, हे स्पष्ट झाले. (Mo Babat appointed as RCB’s director of cricket in IPL 2024.)
महत्वाच्या बातम्या –
World Cup Countdown: फ्लाईंग कैफचा 20 वर्षापासून अबाधित असलेला विक्रम, श्रीलंकेविरुद्ध दाखवलेला जलवा
वर्ल्डकपआधी दुखापतींचे सत्र सुरूच! विलियम्सनपाठोपाठ ‘या’ संघाचाही कर्णधार जायबंदी