---Advertisement---

इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व

---Advertisement---

साऊथँमप्टन। काल(८ सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने विजय मिळवत व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी इंग्लंडचा प्रभारी कर्णधार मोईन अलीने एक खास विक्रम केला आहे.

इंग्लंडचा नियमित कर्णधार ओएन मॉर्गनला दुसऱ्या टी२० सामन्यात खेळताना दुखापत झाली. त्यामुळे तो काल तिसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी उतरला नाही. त्याच्या ऐवजी मोईन अलीने इंग्लंडचे नेतृत्व केले. मोईनचा हा इंग्लंडचा टी२० कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये इंग्लंडचे नेतृत्व करणारा एकूण १० खेळाडू ठरला आहे.

विशेष म्हणजे २०१५ नंतर इंग्लंडला मिळालेला तो नवा टी२० कर्णधार आहे. २०१५ ला जॉस बटलरने पहिल्यांदा नेतृत्व केले होते. तो इंग्लंडचा ९ वा टी२० कर्णधार होता. त्यानंतर इंग्लंडला १० वा टी२० कर्णधार पहाण्यासाठी ५ वर्षे वाट पहावी लागली.

इंग्लंडकडून सर्वाधिक टी२० सामन्यात मॉर्गनने नेतृत्व केले आहे. त्याने ५१ सामन्यात नेतृत्व केले आहे. तर त्याच्या पाठोपाठ पॉल कॉलिंगवूड आहे. कॉलिंगवूडने ३० सामन्यात कर्णधारपद सांभाळले आहे. इंग्लंडकडून ३० किंवा त्यापेक्षा अधिक टी२० सामन्यात नेतृत्व करणारे केवळ हे २ क्रिकेटपटू आहेत.

इंग्लंडचे टी२० कर्णधार –  

५१ सामने – ओएन मॉर्गन

३० सामने – पॉल कॉलिंगवूड

२७ सामने – स्टुअर्ट ब्रॉड

४ सामने – जॉस बटलर

३ सामने – ग्रॅमी स्वान

३ सामने – अँड्र्यू स्ट्रॉस

२ सामने – मायकल वॉन

१ सामना – ऍलिस्टर कूक

१ सामना – जेम्स ट्रेडवेल

१ सामना – मोईन अली

महत्त्वाच्या बातम्या – 

…म्हणूनच चेतेश्वर पुजाराला आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळण्याचे दु:ख नाही

इंस्टाग्रामच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सची भरारी! अगदी सीएसकेही…

एक- दोन नाहीतर तब्बल ६ गोलंदाजांच्या ऍक्शनची बुमराहने केली नक्कल, व्हिडिओ होतोय व्हायरल

ट्रेंडिंग लेख –

३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध

आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप

रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---