---Advertisement---

मोईन अन् लिव्हिंगस्टोनचा धुमाकूळ! एकाच सामन्यात ठोकलेत ९ सिक्स

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 9:32 AM
Moeen-Ali-Liam-Livingstone
---Advertisement---

मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोनची द हंड्रेडमध्ये उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. या दोघांच्या जोरावर बर्मिंगहॅम फिनिक्सने द हंड्रेड २०२२च्या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सविरुद्ध ७ गडी राखून मोठा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रेंट रॉकेट्स संघाने १०० चेंडूत ६ गडी बाद १४५धावा केल्या. प्रत्युत्तरात बर्मिंगहॅमने १४ चेंडू राखून लक्ष्याचा पाठलाग केला. मोईन आणि लिव्हिंगस्टोन या दोघांनी अर्धशतके ठोकली. एवढेच नाही तर दोघांनी ९ षटकारांसह १३ चौकारही ठोकले.

मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोनने यावेळी ८५ धावांची मोठी भागीदारी करत संघाला विजयाच्या मार्गावर आणले. मोईन २८ चेंडूत ५२ धावा काढून बाद झाला. स्ट्राइक रेट १८६ होता. तर लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूत ५१ धावा केल्या. १५९च्या स्ट्राइक रेटसह त्याने एक चौकार आणि चार षटकार लगावले.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच रंगली तुंबळ! तिकीट खरेदी करण्यासाठी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये रस्सीखेच

राहुलचं टेन्शन वाढलंय! स्टार अष्टपैलू खेळडू थेट मालिकेतून होणार बाहेर

वाढदिवस विशेष- कसोटी क्रिकेट गाजवलेल्या चंद्रपाॅलबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---