---Advertisement---

मोईनने निवडली सीएसकेची ‘ऑल टाईम ग्रेट’ इलेव्हन! ही नावे चकित करणारी, तुम्हीही पाहा

csk-2021-ipl
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्सचे नाव घेतले जाते. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील या संघाने आतापर्यंत पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद जिंकले असून, दहा वेळा अंतिम फेरी खेळण्याचा मान मिळवला आहे. या संघासाठी आतापर्यंत अनेक दिग्गजांनी आपले कौशल्य दाखवले आहे. अशात आता याच संघासाठी मागील तीन वर्षांपासून खेळणारा इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याने चेन्नईची ऑल टाईम इलेव्हन जाहीर केली आहे.अली हा मागील तीन वर्षांपासून संघाच्या विजयात मोलाचे योगदान देताना दिसतोय. तो संघाचा भाग झाल्यापासून संघाने दोन वेळा विजेतेपद देखील आपल्या नावे केले. नुकतेच एका मुलाखतीत त्याला चेन्नईची सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनबाबत विचारले गेले. त्यावेळी त्याने आपले मत व्यक्त करताना अनेक मोठ्या नावांचा या संघात समावेश केला.

त्याने आपल्या संघात सलामीवीर म्हणून सध्या चेन्नईचा सर्वोत्तम फलंदाज मानला जाणारा ऋतुराज गायकवाड व ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉटसन यांचा समावेश केला. मधल्या फळीत त्याने सुरेश रैना, अंबाती रायडू व माईक हसी यांना संधी दिली. फिनिशर व कर्णधार म्हणून त्याने एमएस धोनीला आपल्या संघात स्थान दिले. तर अष्टपैलू म्हणून ड्वेन ब्राव्हो व रवींद्र जडेजा संघात जागा बनवण्यात यशस्वी ठरले. हरभजन सिंग हा फिरकी गोलंदाज म्हणून संघात असेल. तर वेगवान गोलंदाज म्हणून दीपक चहर व जोश हेजलवूड जबाबदारी सांभाळतील.

मोईन अलीचा ऑल टाइम ग्रेट चेन्नई सुपर किंग्स संघ: ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबाती रायुडू, माईक हसी, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, हरभजन सिंग, जोस हेजलवूड व दीपक चहर.

(Moeen Ali Announced His All Time Great CSK XI)

महत्त्वाच्या बातम्या-
WI vs IND । ‘हे’ आहे शार्दुलला बाहेर बसवण्याचं कारण, समोर आली महत्वाची माहिती
नारायणच्या फिरकी गोलंदाजीचा अमेरिकेत राडा, स्टार फलंदाजाचा पहिल्यांदाच सामना करताना दाखवला तंबूचा रस्ता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---