क्रिकेटटॉप बातम्या

नारायणच्या फिरकी गोलंदाजीचा अमेरिकेत राडा, स्टार फलंदाजाचा पहिल्यांदाच सामना करताना दाखवला तंबूचा रस्ता

यूएसएमधील मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत एकापेक्षा एक रंजक सामने होताना दिसत आहेत. स्पर्धेतील 9वा सामना गुरुवारी (दि. 20 जुलै) वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघात खेळला गेला. हा सामना वॉशिंग्टन संघाने 6 विकेट्सने जिंकला. या सामन्यात वॉशिंग्टन संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संगाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.

नारायणच्या गोलंदाजीवर मॅथ्यू शॉर्ट तंबूत
या सामन्यात लॉस एंजेलिस नाईट रायडर्स (Los Angeles Knight Riders) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 175 धावा केल्या होत्या. हे आव्हान वॉशिंग्टन फ्रीडम (Washington Freedom) संघाने 18.1 षटकात 4 विकेट्स गमावून 177 धावा चोपत पूर्ण केले. अशाप्रकारे हा सामना वॉशिंग्टनने 6 विकेट्सने आपल्या नावावर केला.

नाईट रायडर्सचा कर्णधार सुनील नारायण (Sunil Narine) याने वॉशिंग्टन फ्रीडम संघाचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज मॅथ्यू शॉर्ट याला तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी नारायणने त्याला बाद करण्यासाठी आपल्या शानदार फिरकीचा वापर केला. शॉर्टने यावेळी 35 चेंडूत 43 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.

पहिल्यांदाच गोलंदाजी करताना शॉर्टची विकेट
विशेष म्हणजे, नारायण याने त्याच्या शानदार टी20 कारकीर्दीत शॉर्टविरुद्ध गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ होती. यादरम्यान वॉशिंग्टन संघाच्या डावातील 13व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर नारायण याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाजाला अडकवले. नारायणचा चेंडू खेळण्यास शॉर्ट चुकला. त्यामुळे वॉशिंग्टनच्या बाजूने चाललेल्या या एकतर्फी सामन्यात नाईट रायडर्सने पुनरागमन केले. मात्र, शेवटी नाईट रायडर्सच्या हाती निराशाच आली. हा सामना वॉशिंग्टन संघाने जिंकला. सामन्यात रायडर्सकडून आंद्रे रसेल याने 37 चेंडूत सर्वाधिक 70 धावा केल्या. त्यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. अशात सामना गमावूनही त्याच्या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

वॉशिंग्टनला पॉवरप्लेचा फायदा
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाचा कर्णधार सुनील नारायण याने सामन्यानंतर बोलताना म्हटले की, “मी विचार केला होता की, 175 ही चांगली धावसंख्या होती. मात्र, वॉशिंग्टन फ्रीडमने पॉवरप्लेमध्ये याचा पुरेपूर फायदा उचलला आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने केला. आम्ही सर्वकाही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, असे काहीच घडले नाही. अशात आम्ही आपल्या योजना लागू करू शकलो नाहीत. हेच क्रिकेट आहे.”

नाईट रायडर्स प्लेऑफमधून बाहेर
अशात या सामन्यात सलग चौथ्या पराभवासोबत लॉस एंजेलिस संघ अधिकृतरीत्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. तसेच,  नाईट रायडर्स हा उद्घाटनाच्या हंगामातील 6 संघामध्ये सुरू असलेल्या सामन्यांतील एकही सामना न जिंकणारा एकमेव संघ बनला. (cricketer sunil narine produce brilliant off spin to dismiss matthew short in lakr vs waf of mlc inaugural season)

महत्त्वाच्या बातम्या-
‘माझी आई फक्त तुला पाहायला आलीये, माझी इच्छाये तू…’, विंडीज खेळाडूची विराटला खास विनंती
‘सचिननंतर विराटच…’, किंग कोहलीचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही वेस्ट इंडिजचा दिग्गज

Related Articles