त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आमने-सामने आहेत. या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने गड राखला. पहिल्या डावात भारताने 84 षटकात 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली नाबाद 87 धावांवर खेळत आहे. तसेच, रवींद्र जडेजा हादेखील 84 चेंडूत 36 धावांवर खेळत आहे. अशात विराट या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट शतक करेल अशी सर्व क्रिकेटप्रेमींना आशा आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज जोशुआ डा सिल्वा यालाही असेच वाटते की, विराटने त्याचे शतक लवकर पूर्ण करावे.
काय म्हणाला जोशुआ?
झाले असे की, सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि जोशुआ डा सिल्वा (Virat Kohli And Joshua Da Silva) एकमेकांशी बोलताना दिसले. यादरम्यानचे संभाषण स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले. जोशुआ डा सिल्वा (Joshua Da Silva) म्हणाला की, “माझी आई मला म्हणालीये की, ती फक्त विराट कोहलीला पाहायला आली आहे. मला यावर विश्वास नाही बसला. आपले शतक पूर्ण कर विराट. माझी इच्छा आहे की, तू तुझे शतक करावे.”
विराट कोहलीचा 500वा सामना
खरं तर, विराट कोहली (Virat Kohli) वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. जर तो या सामन्यात शतक ठोकण्यात यशस्वी झाला, तर तो 500व्या सामन्यात शतक ठोकणारा जगातील पहिला खेळाडू बनेल. या शतकानंतर विराटच्या नावावर कसोटीत 29 शतकांची नोंद होईल. अशाप्रकारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली 76 शतके पूर्ण करेल. विराट आपल्या शतकापासून फक्त 13 धावा दूर आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, विराट आपल्या 500व्या कसोटीत शतकाचा आकडा पार करतो की नाही.
सेहवाग आणि रिचर्ड्स यांच्या विक्रमाला तडा
विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजी करताना भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवाग याचा 8586 धावांचा आकडा मोडला. खरं तर, या सामन्यापूर्वी विराट धावांच्या बाबतीत सेहवागच्या मागे होते. मात्र, आता त्याने हा आकडा पार केला आहे. विराटच्या नावावर आता 8642 धावा केल्या आहेत. सेहवागसोबतच विराटने विवियन रिचर्ड्स यांचाही विक्रम मोडला आहे. रिचर्ड्स यांच्या नावावर कसोटीत 8540 धावा आहेत. (west indies cricketer joshua da silva said to virat get your 100 my mom coming to watch you read more)
महत्त्वाच्या बातम्या-
‘सचिननंतर विराटच…’, किंग कोहलीचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही वेस्ट इंडिजचा दिग्गज
विराटसोबत बॅटिंग केल्यानंतर नव्या दमाच्या यशस्वीची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी धन्य झालो…’