भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील हा दुसरा सामना निर्णायक असून भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली आहे. यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा यांच्यासह विराट कोहली देखील पहिल्या डावात संघासाठी महत्वाचे योगदान देऊ शकला. पहिल्या दिवसाखेर त्याने 87* धावा केल्या आसून त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत विराट वेस्ट इंडीजच्या यष्टीरक्षाशी बोलताना झाप पाडताना दिसत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहली यशस्वी जयसवाल (Yashashvi Jaiswal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी डावाची सुरुवात केली. जयसवालने 57, तर रोहितने 80 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. नेहमी सलामीला खेळणारा शुबमन गिल या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना अपयशी ठरल्याचे दिसते. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पहिल्या डावात त्याने 10 धावा करून विकेट गमावली. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानेही 36 चेंडूत 8 धावा करून विकेट गमावली. पहिल्या दिवसाखेर विराट कोहली (Virat Kohli) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) खेळपट्टीवर कायम आहेत. जडेजाने 36* धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात भारताला भक्कम स्थितीपर्यंत नेण्यासाठी आणि विरोधी संघावर दबाव बनवण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) याने महत्वाची भूमिका पार पाडली. भारताच्या डावातील 72व्या षटकात विराट कहोलीने एक-दोन नाही तर तीन वेळा खेळपट्टीवर पळत दोन-दोन धावा घेतल्या. एकादा तर त्याने डाईव्ह मारून स्वतःची विकेट वाचवली. याचदरम्यान विराट आणि वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक जोशुआ डा सिल्वा (Joshua Da Silva) यांच्यातील संभाषण समोर येत आहे. व्हायरल होत असेलल्या व्हिडिओत विराट यष्टीरक्षकाला म्हणत आहे की, “मी 2012 पासून अशा दोन-दोन धावा घेत आलो आहे.” विराट आणि यष्टीरक्षकात झालेली चर्चा स्टंप माईकमध्ये कैद झाली आहे.
Virat Kohli : Stealing doubles since 2012 🤣🤣😂😂 pic.twitter.com/VRqcUbs9iy
— flick (@133notout) July 20, 2023
दरम्यान, उभय संघांतील या कसोटी मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारताने डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. (Virat Kohli in stump mic said: “I am stealing doubles since 2012” and smiles)
महत्वाच्या बातम्या –
विराटसोबत बॅटिंग केल्यानंतर नव्या दमाच्या यशस्वीची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी धन्य झालो…’
उपकर्णधारपद मिळताच धावा करायला विसरला रहाणे! दुसऱ्या कसोटीतही सपशेल फ्लॉप, संघाचे दरवाजे पुन्हा होणार बंद?