गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पोर्ट ऑफ स्पेन कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. भारताने पहिल्या दिवशी 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या. या कसोटीत सर्वांच्या नजरा अजिंक्य रहाणे याच्या नावावर होत्या. रहाणेवर धावा करण्याचा दबाव होता. स्वत: फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही त्याचा फॉर्म दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 35 वर्षीय रहाणे अवघ्या 8 धावांवर तंबूत परतला. अशात रहाणेची स्थितीही चेतेश्वर पुजारासारखी होऊन त्यालाही भारतीय संघातून बाहेर काढले जाईल, असे बोलले जात आहे.
जवळपास दीड वर्षे होता संघातून बाहेर
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier Leageue 2023) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून अविश्वसनीय प्रदर्शन केले होते. त्या प्रदर्शनाच्या जोरावर निवडकर्त्यांनी त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात जागा देऊन सर्वांना हैराण केले होते. कारण, रहाणे जवळपास दीड वर्षांपासून संघाबाहेर होता. एवढंच नाही, तर उपकर्णधाराला बाहेर काढून केंद्रीय करारात जागा न देणे, यावरून स्पष्ट होत होते की, निवडकर्ते त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा विचार करत आहेत.
मात्र, 18 महिन्यांनंतर रहाणेने कसोटीच्या डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला विंडीज दौऱ्यावर उपकर्णधार म्हणून कसोटी संघात संधी मिळाली. असे असले, तरीही तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर सलग दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात फ्लॉप ठरला. यामध्ये त्याने 36 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्यापूर्वी पहिल्या सामन्यातही त्याने फक्त 3 धावा केल्या होत्या. या प्रदर्शनाने कदाचित तोदेखील नाराज होईल.
श्रेयस अय्यर घेऊ शकतो जागा
अशात दुसऱ्या डावात रहाणे चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. कारण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फिट होईल. मधल्या फळीत अय्यरने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, दुखापतीमुळे तो आत-बाहेर होत आला आहे. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी या सामन्यापूर्वी म्हटले होते की, “तांत्रिकदृष्ट्या तुम्ही सातत्याने काम करता, पण मला त्याच्या स्थिर स्वभावाने प्रभावित केले. तो चेंडू उशिरा खेळत होता आणि शरीराच्या जवळही. तो नेट्समध्येही असेच खेळत आहे, जशी दक्षिण आफ्रिकेत गरज असेल.”
भारत 4 बाद 288
त्रिनिदाद (Trinidad) येथील पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) मैदानात दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय संघ नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल (Rohit Sharma And Yashasvi Jaiswal) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने चांगली सुरुवात केली. मात्र, 8 षटकांच्या आतच भारताचे अव्वल 3 फलंदात तंबूत परतले होते. रहाणेही फार काळ टिकला नाही, त्यानेही नांग्या टाकल्या. त्यानंतर विराट कोहली (नाबाद 87) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 36) यांनी संघाला संकटातून बाहेर काढून मजबूत स्थितीत आणले. (cricketer ajinkya rahane flop in west indies test series departs for just 8 runs clean bowled by shannon gabriel 2nd test)
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमनचा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय चुकला? विंडीजने दोन्ही वेळा दिल्या खोल जखमा
भारतीय सलामी जोडीला 24 वर्षांनी सापडला मुहूर्त, ‘हा’ कारनामा करत खास यादीत पटकावला दुसरा क्रमांक