---Advertisement---

त्रिनिदादचा पहिला दिवस भारताच्या नावावर, विराट-जडेजाने फोडली विंडीजची गोलंदाजी; शतकाची प्रतीक्षाही संपणार!

Ravindra-Jadeja-And-Virat-Kohli
---Advertisement---

वेस्ट इंडिजच्या पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 20 जुलै) सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारतीय सलामीवीरांनी शानदार भागीदारीसह दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सांभाळला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या आहेत.

सलामीवारांचे अर्धशतक
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात पोर्ट ऑफ स्पेन येथे टी-ब्रेकपर्यंत भारताने चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे असे वाटत होते की, यजमान संघ सहजरीत्या पुनरागमन करेल. मात्र, असे काहीच घडले नाही. सामन्याचा पहिला दिवस पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल यांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी रचली. ही भागीदारी 139 धावांची झाली. यात रोहितने 120 चेंडूत 74 धावा, यशस्वी जयसवालने 74 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले. पुढे रोहितकडून शतकाची अपेक्षा होती, पण तो 143 चेंडूत 80 धावा करून बाद झाला.

गिल पुन्हा अपयशी
त्याच्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या शुबमन गिल (Shubman Gill) हा पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरला. त्याने यावेळी 12 चेंडू खेळून फक्त 11 धावा केल्या. पहिल्या कसोटीतही त्याने फक्त 11 चेंडूत 6 धावा केल्या होत्या. गिल पाठोपाठ पाचव्या क्रमांकावरील फलंदाज अजिंक्य रहाणे हाही खास कामगिरी करू शकला नाही. त्याला 36 चेंडूत 8 धावा करून तंबूत परतावे लागले.

दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजचे पुनरागमन
पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी आशा जागवल्या होत्या. दुसऱ्या सत्रात यजमानांच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत टी-ब्रेकपर्यंत भारतीय संघाला 4 बाद 182 धावांवर पोहोचवले होते. यावेळी भारतीय संघ दुसऱ्या सत्रात 24.4 षटकात फक्त 61 धावा करू शकला होता आणि 4 विकेट्सवरही पाणी सोडले होते.

विराटचे 500व्या सामन्यात खास प्रदर्शन
मात्र, तिसऱ्या सत्रात भारताने पुनरागमन केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने तिसऱ्या सत्रात टिच्चून फलंदाजी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विराटने नाबाद 87 धावा केल्या. विशेष म्हणजे, विराटचा हा 500वा आंतरराष्ट्रीय सामनाही आहे. अशात विराटचा खेळ पाहता त्याच्याकडून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतकाची अपेक्षा केली जात आहे. विराटसोबत जडेजानेही संघाचा डाव सावरला. तो नाबाद 36 धावांवर खेळतोय. विशेष म्हणजे, विराट आणि जडेजामध्येही नाबाद 106 धावांची भागीदारी झाली आहे. (Trinidad 2nd Test Update With Virat Kohli and Ravindra Jadeja unbeaten, India score 288 for 4 on Day 1)

महत्त्वाच्या बातम्या-
रोहितची विंडीजवर दादागिरी सुरूच! आक्रमक अर्धशतकासह बनवली दमदार आकडेवारी
मॅंचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व! क्राऊली-रूटच्या झंझावाती फलंदाजीत ऑस्ट्रेलियाची वाताहात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---