---Advertisement---

विराट क्रिकेटच्या एलिट 500 क्लबमध्ये! ‘या’ दिग्गजांच्या मांदियाळीत झाला सामील

---Advertisement---

गुरुवारी (20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू झाला. या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली त्याच्या 500 वा आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरला. यासोबतच त्याची क्रिकेट इतिहासात ही कामगिरी करणाऱ्या मोजक्याच खेळाडूंमध्ये नोंद झाली.

पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत उतरताच भारतासाठी 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट समाविष्ट झाला. भारताकडून तसेच जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी माजी कर्णधार एमएस धोनी असून ,धोनीने त्याच्या कारकीर्दीत भारताकडून 538 सामने खेळले. तसेच, तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड असून, त्याने कारकीर्दीत एकूण 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते.

इतर देशांच्या क्रिकेटपटूंबद्दल सांगायचे झाल्यास, श्रीलंकेचे माहेला जयवर्धने (652 सामने), कुमार संगकारा (594 सामने), सनथ जयसूर्या (586 सामने), ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग (560 सामने), पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (524 सामने) व दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस (519 सामने) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 500 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, उभय संघांमधील हा शंभरावा कसोटी सामना आहे. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात या सामन्यासाठी एक बदल केला गेला. शार्दुल ठाकूर यांच्या जागी बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याला संधी दिली गेली.

(Virat Kohli Entered In His 500th International Match Become Fourth Indian And 10th Overall)

महत्वाच्या बातम्या –
WIvIND: दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची प्रथम फलंदाजी! मुकेश कुमारचे पदार्पण, विराटचा 500 वा सामना
पंतच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाला विश्वचषकात खेळायचाय, वेटलिफ्टिंगला केली सुरुवात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---