---Advertisement---

रोहितची विंडीजवर दादागिरी सुरूच! आक्रमक अर्धशतकासह बनवली दमदार आकडेवारी

---Advertisement---

गुरुवारी (20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू झाला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी शतकी सलामी दिली. त्याचवेळी रोहितने वेस्ट इंडीज विरुद्ध आपला शानदार कामगिरीचा आलेख आणखी उंचावता केला

पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत रोहितने सलामीला येत आक्रमक फलंदाजी केली. त्याने यशस्वीला सोबत घेत केवळ 20 षटकांत 100 धावांची भागीदारी केली. त्याचवेळी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पंधरावे अर्धशतक पूर्ण केले. चहापानानंतर देखील रोहित चांगली फटकेबाजी करत होता. मात्र, 80 धावांवर वारिकन याने त्याला बाद केले. असे असले तरी रोहितची वेस्ट इंडीजविरुद्धची दमदार कामगिरी कायम राहिली.

वेस्ट इंडीजविरूद्ध रोहितचा हा केवळ सहावा कसोटी डाव होता. विशेष म्हणजे या सहा पैकी तीन डावांमध्ये तो शतकाची वेस ओलांडण्यात यशस्वी ठरला आहे. 2013 मध्ये याच संघाविरुद्ध कोलकाता येथे पदार्पण करताना त्याने पहिल्या सामन्यात 177 तर मुंबई येथे दुसऱ्या सामन्यात 111 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतरच्या दोन डावांमध्ये अनुक्रमे नऊ व 41 धावा त्याने केल्या. त्यानंतर आता अर्धशतक ठोकत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आपली आकडेवारी आणखी शानदार केली.

कसोटीच्या पहिल्या दिवशी अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत भारतीय संघाने 3 बाद 176 धावा केल्या होत्या. विराट कोहली 15 तर अजिंक्य रहाणे सहा धावा काढून नाबाद होता.

(WIvIND Rohit Sharma Show Another Steller Performance Against West Indies)

महत्वाच्या बातम्या –
WIvIND: दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची प्रथम फलंदाजी! मुकेश कुमारचे पदार्पण, विराटचा 500 वा सामना
पंतच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाला विश्वचषकात खेळायचाय, वेटलिफ्टिंगला केली सुरुवात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---