---Advertisement---

भारतीय सलामी जोडीला 24 वर्षांनी सापडला मुहूर्त, ‘हा’ कारनामा करत खास यादीत पटकावला दुसरा क्रमांक

Rohit-Sharma-And-Yashasvi-Jaiswal
---Advertisement---

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमानांविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल या सलामीवीरांची बॅट त्रिनिदाद कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगलीच तळपली. पहिल्या दिवसाच्या खेळात या जोडीने अर्धशतक झळकावत खास विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. विशेष म्हणजे, 24 वर्षानंतर असा विक्रम केल्याने सर्वत्र त्यांचे गोडवे गायले जात आहेत.

रोहित आणि यशस्वीचा विक्रम
झाले असे की, डॉमिनिका कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल (Rohit Sharma And Yashasvi Jaiswal) यांच्यात 200 धावांची सलामी भागीदारी झाली होती. त्यामुळे अनेक विक्रम मोडले गेले होते. पहिल्या कसोटीनंतर आता ही जोडी दुसऱ्या कसोटीतही फॉर्ममध्ये आहे. या जोडीने सलग दुसऱ्या सामन्यात शतकी भागीदारी रचत खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

सन 1999मध्ये न्यूजीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेदरम्यान भारतीय सलामी जोडी सदागोपन रमेश आणि देवांग गांधी (Sadagopan Ramesh and Devang Gandhi) यांनी सलग दोन (137, 162) शानदार शतकी भागीदारी केली होती. आता 24 वर्षांनंतर रोहित आणि जयसवाल यांनीही एकाच मालिकेत अशी कामगिरी करणारी दुसरी जोडी बनण्याचा मान मिळवला.

यासोबतच वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या सलामी जोडीच्या बाबतीत रोहित आणि जयसवाल यांनी वसीम जाफर- वीरेंद्र सेहवाग यांची बरोबरी केली आहे. त्यांनी वेस्ट इंडिजमध्येही 2 शतकी भागीदारी केली होती. (openers rohit sharma and yashasvi jaiswal becomes the second pair to hit consecutive century stand after 24 years read)

सलग सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या भारतीय सलामी जोड्या
3 वेळा- वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय (2008-09)
2 वेळा- सुनील गावसकर आणि फारोख इंजीनिअर (1973-74)
2 वेळा- सुनील गावसकर आणि अंशुमन गायकवाड (1976)
2 वेळा- सुनील गावसकर आणि अरुण लाल (1982)
2 वेळा- सदागोपन रमेश आणि देवांग गांधी (1999)
2 वेळा- रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल (2023)*

वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी सलामी जोडी
2 वेळा- वसीम जाफर आणि वीरेंद्र सेहवाग
2 वेळा- रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल*

महत्त्वाच्या बातम्या-
झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर यशस्वीचा विश्वविक्रम, बनला ‘असा’ पराक्रम करणारा दुसराच फलंदाज
त्रिनिदादचा पहिला दिवस भारताच्या नावावर, विराट-जडेजाने फोडली विंडीजची गोलंदाजी; शतकाची प्रतीक्षाही संपणार!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---