पदार्पणाचा सामना गाजवण्याची धमक खूपच कमी खेळाडूंमध्ये असते. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयसवाल याच्या नावाचाही समावेश होतो. जयसवालने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करून पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहली त्याच्या कारकीर्दीतील 500वा सामना खेळत आहे. अशातच जयसवालने विराटसोबत फलंदाजी करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने विराट कोहली (Virat Kohli) याच्याबाबत बोलताना म्हटले की, “मी त्यांच्यासोबत खेळून धन्य झालो.” यावेळी त्याने विराटला दिग्गजही म्हटले. आयसीसीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत यशस्वी जयसवाल विराट कोहली याच्याविषयी बोलताना दिसत आहे. तो म्हणाला की, “ते दिग्गज आहेत. मी त्यांच्यासोबत खेळून धन्य झालो आहे. हे खूपच शानदार आहे. त्यांच्यासोबत तिथे जाणे आणि त्यांना पाहणे, त्यांच्याकडून शिकणे खूपच चांगले आहे.”
पुढे बोलताना जयसवाल म्हणाला की, “मला वाटते की, त्यांच्याकडून शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. जेव्हाही मी त्यांना क्रिकेटच्या बाहेर आणि खेळताना पाहतो, तेव्हा त्यांना पाहत राहणे खूप महत्त्वपूर्ण असते की, ते काय करतात. सराव सत्रात फलंदाजी करताना त्यांच्याकडून शिकणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांना ऐकणे आणि निश्चितच त्यांच्यासोबत खेळणे आनंदाची बाब आहे.”
https://www.instagram.com/reel/Cu8QYB_t5Fo/?utm_source=ig_embed&ig_rid=411b9558-50a8-481c-bdd7-d2e6ba8aee7d
दुसऱ्या कसोटीची सुरुवात अर्धशतकाने
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील दुसऱ्या कसोटीत सलामीवीर यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 1 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी साकारली. विशेष म्हणजे, त्याने डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत जयसवालने 171 धावांची शानदार खेळी साकारली होती.
शतकाच्या जवळ विराट कोहली
दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपल्यानंतर भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहली शतकाच्या खूपच जवळ पोहोचला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत विराटने 8 चौकारांसह 87 धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीच्या जोरावर पहिल्या दिवशी भारताने 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या आहेत. तसेच, विराटला साथ देत रवींद्र जडेजाही 36 धावांवर नाबाद खेळतोय. (ind vs wi 2nd test indian opener yashasvi jaiswal reaction on batting with virat kohli read here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला वाटतंय माझ्या संयमाचा…’, संघातून बाहेर असलेल्या धवनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, तुम्ही पाहिला का?
उपकर्णधारपद मिळताच धावा करायला विसरला रहाणे! दुसऱ्या कसोटीतही सपशेल फ्लॉप, संघाचे दरवाजे पुन्हा होणार बंद?