वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना विराट कोहली याच्यासाठी खूपच खास आहे. यामागील कारण म्हणजे विराटचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500वा सामना आहे. याच सामन्यात विराटने भारताच्या पहिल्या डावात टिच्चून फलंदाजी करत खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या विक्रमात तो जगातील पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज जॅक कॅलिस यालाही पछाडले आहे. चला तर, विराटच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट पाचवा फलंदाज
विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीय संघाच्या पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 161 चेंडू खेळून नाबाद 80 धावा केल्या. यामध्ये 8 चौकारांचा समावेश होता. या धावा करताच विराटच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली 25548 धावा (Virat Kohli 25548 Runs) करण्यात यशस्वी झाला. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनला. त्याने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिस (Jacque Kallis) याला मागे सोडले. कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 25534 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता विराटने पछाडल्याने तो सहाव्या स्थानी घसरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. सचिनने त्याच्या कारकीर्दीत एकूण 34357 धावा केल्या आहेत. यामध्ये 100 शतकांचाही समावेश आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) आहे. त्याने 28016 धावा केल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी असलेल्या रिकी पाँटिंग याने 27483 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावरील माहेला जयवर्धने याने 25957 धावा केल्या आहेत.
यादीत सातव्या स्थानी भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 24208 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
34357 – सचिन तेंडुलकर
28016 – कुमार संगकारा
27483 – रिकी पाँटिंग
25957 – माहेला जयवर्धने
25548 – विराट कोहली*
25534- जॅक कॅलिस
24208 – राहुल द्रविड
भारताचा डाव
भारतीय संघाने पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या आहेत. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (80) आणि यशस्वी जयसवाल (57) या सलामीवीरांनी अर्धशतक साकारले. तसेच, शुबमन गिल (10) आणि अजिंक्य रहाणे (8) स्वस्तात बाद झाले. याव्यतिरिक्त विराट कोहली (87) आणि रवींद्र जडेजा (36) नाबाद आहेत.
That's Stumps on Day 1 of the 2⃣nd #WIvIND Test!
Solid show with the bat from #TeamIndia 👍👍
8️⃣7️⃣* for @imVkohli
8️⃣0️⃣ for Captain @ImRo45
5️⃣7️⃣ for @ybj_19
3️⃣6️⃣* for @imjadejaWe will see you tomorrow for Day 2️⃣ action!
Scorecard ▶️ https://t.co/d6oETzoH1Z pic.twitter.com/FLV0UzsKOT
— BCCI (@BCCI) July 20, 2023
विंडीजकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले. त्यात केमार रोच, शॅनन गॅब्रियल, जोमेल वॉरिकन आणि जेसन होल्डर यांचा समावेश आहे. या चारही गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली आहे. (Virat Kohli now 5th Leading Runscorer in International Cricket read here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला वाटतंय माझ्या संयमाचा…’, संघातून बाहेर असलेल्या धवनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, तुम्ही पाहिला का?
उपकर्णधारपद मिळताच धावा करायला विसरला रहाणे! दुसऱ्या कसोटीतही सपशेल फ्लॉप, संघाचे दरवाजे पुन्हा होणार बंद?