पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvENG) यांच्यात सात सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. पाकिस्तान यजमान असलेल्या या मालिकेत पाहुण्या संघाने बाजी मारली. इंग्लंडने ही मालिका 4-3 अशी जिंकली. या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) खेळला गेला. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने 67 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंड संघाचा कर्णधार मोईन अली याने धक्कादायक विधान केले आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार मोईन अलीने मालिका विजयानंतरचे स्वागत आणि आदरातिथ्य केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोईन अलीने कराची आणि लाहोरमध्ये दिल्या गेलेल्या अन्नाविषयी आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“जोपर्यंत अन्नाचा प्रश्न आहे, वैयक्तिकरित्या मी याबद्दल थोडा निराश आहे. कराचीच्या तुलनेत लाहोरमधील जेवण थोडे निकृष्ट दर्जाचे होते.”
सात सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले चार सामने कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर तर उर्वरित तीन सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आले. याच पत्रकार परिषदेत मोईनने सुरक्षेचे मात्र कौतुक केले. आपल्याला अपेक्षेपेक्षा चांगली सुरक्षा मिळाली असे त्याने कबूल केले.
तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघासाठी ही मालिका कमालीची रोमांचक ठरली. दौऱ्याच्या सुरुवातीलाच कर्णधार जोस बटलर दुखापतग्रस्त झाला होता. मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने तर दुसरा सामना पाकिस्तान संघाने जिंकला होता. तिसरा सामना इंग्लंडने जिंकल्यानंतर पुढील दोन सामने पाकिस्तानने आपल्या नावावर केले होते. त्यानंतर सहाव्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडने हा दौरा यशस्वी केला. टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडसाठी हा मालिका विजय आत्मविश्वास मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘ते 17 वर्षांनंतर आले तर त्यांना रिकाम्या…’ पाकिस्तान हरल्यावर हे काय बोलून गेले पीसीबी अध्यक्ष
T20WC: बुमराहबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मोठे भाष्य! म्हणाला, ‘भारताला जिंकण्यासाठी त्याचे संघात…’




