आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मानाची मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ऍशेस कसोटी मालिकेला गौरविले जाते. 16 जूनपासून इंग्लंडमध्ये ही पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा प्रमुख फिरकीपटू जॅक लिच हा दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी इंग्लंड एका निवृत्त क्रिकेटपटूला संघात संधी देऊ इच्छिते.
यावेळी ऍशेस मालिकेचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. मागील मालिकेत इंग्लंडला ऑस्ट्रेलियात पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे ही मालिका इंग्लंड संघासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अशाच संघाचा सर्वात अनुभवी फिरकीपटू लिच बाहेर होणे संघासाठी धोक्याची घंटा असेल.
या संपूर्ण घटनेनंतर इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम हा कसोटीमधून निवृत्त झालेला अष्टपैलू मोईन अली याला संघात स्थान देऊ इच्छित आहे. अली याने दोन वर्षांपूर्वी मर्यादित घटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मॅकलमने मागील वर्षी देखील त्याला संघात पुनरागमनाची दरवाजे खुले असल्याचे म्हटले होते. मात्र, आपण पुन्हा कसोटी खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केलेले. मात्र, यावेळी संघाची गरज पाहता तो आपला निर्णय बदलू शकतो. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 64 सामने खेळताना 2914 धावा व 195 बळी टिपले होते.
यावेळी 16 जूनपासून ऍजबस्टन येथे या मालिकेला सुरुवात होईल. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड प्रथमच ऍशेस खेळेल. मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी इंग्लंड संघाचे नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
(Moeen Ali Considering Test Cricket Comeback For Ashes After Jack Leach Injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेजलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात सामील झालेला पठ्ठ्या आहे तरी कोण, भारताची डोकेदुखी वाढवणार का?
Cricket Ball: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये वापरला जाणार Duke Ball, ‘या’ 3 चेंडूंनी आख्खं जग खेळतं क्रिकेट