इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेसाठी मोईन अली पुन्हा एकदा इंग्लंडच्या जर्सीत परतला. पण शनिवारी (17 जून) त्याने केलेल्या एका कामासाठी त्याच्या मोटी किंमत मोजावी लागेल. ऍशेस 2023च्या पहिल्याच सामन्यात आयसीसीकडून त्याच्याविरोधात मोठी कारवाई केली गेली आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस 2023चा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियन संघ 32 धावांनी मागे आहे. शनिवारी, सामन्याच्या दुसऱ्या दिवसी मोईन अली () याला तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट मिळाली. पण याच दिवसासाठी आयसीसी त्याच्याकडून मॅच फीजच्या 25 टक्के रक्कमे दंड म्हणून आकारणार असल्याचे समोर आले.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार मोईनने त्यांच्या आचार संहितेचे उल्लंघन केले असून हा तो लेवल-1 चा दोषी आहे. त्याने आयसीसीचे कलम 2.20 मोडल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याचसासाठी मॅच फीजसोबतच त्याला आयसीसीकडून एक डिमेरीट पॉइंट देखील मिळाला आहे. मागच्या 24 महिन्यांमध्ये त्याला पहिल्यांदाच डिमेरीट पॉइंट मिळाला आहे. मोईन अलीनेही हे आरोप मान्य केले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 89 व्या षटकात मोईन सीमारेषेजवर तो क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. पुढच्या षटकात त्याला गोलंदाजी करायची होती. अशात गोलंदाजीला जाण्याआधी त्याने आपल्या हातावर स्प्रे मारताना दिसला. आयसीसीने सांगितल्याप्रमाणे खेळाडू पंचांच्या परवानगीशिवाय हाताला काहीच लावू शकत नव्हते. पण मोईन अलीने परवानगी न घेता हा स्प्रे हाताला लावला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर पंचांनी यावर चर्चा करून कारवाईचा निर्णय घेतला.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने आपला पहिला डाव 78 षटकांमध्ये 8 बाद 393 धावा करून घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 386 धावांवर गुंडाळला गेला. (Moeen Ali found guilty of breaching the ICC Code Of Conduct He’s fined 25% match fees and one demerit point.)
महत्वाच्या बातम्या –
बॅझबॉल इफेक्ट! स्टोक्सने ख्वाजाविरूद्ध लावली अनाकलनीय फिल्डिंग, पाहा पुढे काय घडले
बहु झाल्या लीग! आणखी एका देशात सुरू होतेय क्रिकेट लीग, नामांकित खेळाडू होणार सहभागी