---Advertisement---

ऑयन मॉर्गन कर्णधार तर या खेळाडूला इंग्लंडने केले आता उपकर्णधार

On: बुधवार, जुलै 22, 2020 8:11 AM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने मंगळवारी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी अष्टपैलू मोईन अलीला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमले.

आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळविण्यात येणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय सामना 30 जुलै रोजी होईल. ही मालिका साऊथॅम्प्टनच्या मैदानावर खेळली जाईल. तीन सामन्यांची ही मालिका रिकाम्या स्टेडियमवर प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल.

दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना 1 ऑगस्टला आणि तिसरा 4 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. इंग्लंडने गेल्या आठवड्यात आयर्लंड मालिकेसाठी 24 सदस्य संघाची घोषणा केली. त्यात अली आणि बेअरस्टोचे पुनरागमन झाले. ज्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी म‍लिकेत निवडले गेले नाही.

अ‍ॅलेक्स हेल्सकडे पुन्हा संघाने दुर्लक्ष केले. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे तो संघातून बाहेर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---