इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वीच इंग्लंड संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
इंग्लंड संघातील खेळाडूंनी तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना पूर्णपणे बॅकफूटवर टाकले होते. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत इंग्लिश कर्णधार जो रूट तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ३ शतक झळकावले आहेत. तो आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. अशातच गुरुवारी (०१ सप्टेंबर) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी कसोटी सामन्यासाठी नवीन उपकर्णधाराची घोषणा केली आहे.
इंग्लंड संघाचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याला कसोटी मालिकेच्या उर्वरित सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. जोस बटलरने त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी त्याच्या पत्नीसोबत राहण्यासाठी पितृत्व रजा घेतली आहे. त्याच्याऐवजी मोईन अलीला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
मोईन अलीने इंग्लंड संघासाठी आतापर्यंत एकूण ६३ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५ शतकांच्या मदतीने २८७९ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने १९३ गडी बाद केले आहेत. तसेच दुखापतग्रस्त असलेला मार्क वूड चौथ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर ख्रिस वोक्स देखील चौथ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे. चौथा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून ओव्हलच्या मैदानावर सुरू होणार आहे.(Moeen Ali named vice captain for 4th test against India)
असा आहे भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी,रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा
असा आहे इंग्लंड संघ
जो रूट (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, रॉरी बर्न्स, सॅम करण, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, डेविड मलान, क्रेग ओवरटन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीतील ५ दिवस कसे असेल लंडनचे हवामान? ‘इतके’ दिवस पावसाची दाट शक्यता
बिग ब्रेकिंग! तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड, करणार कसोटी पदार्पण
सलग ३ शतके ठोकत जो रूटचे कसोटी क्रमवारीत वर्चस्व, रोहितनेही विराटला केले ओव्हरटेक