---Advertisement---

मोईन अलीनं जगातील दोन सर्वोत्तम कर्णधारांची निवड केली, नावं जाणून बसेल धक्का

On: सोमवार, सप्टेंबर 9, 2024 4:13 PM
Moeen Ali
---Advertisement---

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मोईन अलीची कारकीर्द चमकदार राहिली आहे.

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मोईन अलीनं तो ज्यांच्या नेतृत्वाखाली खेळला, त्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांची निवड केली. मोईननं सर्वात आधी महेंद्रसिंह धोनीचं नाव घेतलं. मोईन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो, ज्याचा कर्णधार धोनी आहे. मोईननं धोनीला जगातील सर्वोत्तम कर्णधार म्हटलं. यानंतर या इंग्लिश क्रिकेटपटूनं इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनचं नाव घेतलं.

मोईन अलीनं मॉर्गनला इंग्लंडचा सर्वोत्तम कर्णधार म्हटलंय. ‘इंग्लंड क्रिकेट’ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान जेव्हा मोईनला सर्वोत्तम कर्णधाराबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं उत्तर दिलं, “मला नक्कीच धोनीचं नाव घ्यायला आवडेल. मी त्याच्या हाताखाली खेळलोय. त्याच वेळी इंग्लंडसाठी इऑन मॉर्गन एक चांगला कर्णधार सिद्ध झाला आहे. कर्णधारामध्ये जे महत्त्वाचे गुण असतात, ते त्याच्यामध्ये आहेत. या दोघांनीही कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते अनन्यसाधारण आहे”, असं मोईन म्हणाला.

मोईननं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षणाबद्दल सांगितलं. मोईन म्हणाला, “अशेस आणि दोन विश्वचषक जिंकणं खूप छान होतं. परंतु वैयक्तिक दृष्टिकोनातून, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओव्हलवर माझी कसोटी हॅट्ट्रिक. तिनं आम्हाला सामना जिंकून दिला. याशिवाय इंग्लंडसाठी टी20 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणं. या दोन्ही खेळींचा मला अभिमान आहे.”

मोईन सध्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये आपला पहिला हंगाम खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो गतविजेत्या गयाना ॲमेझॉन वॉरियर्समध्ये बदली खेळाडू म्हणून शामील झाला. त्यानं गेल्या 12 महिन्यांत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्ज आणि बीपीएलमध्ये कोमिल्ला व्हिक्टोरियन्सचं प्रतिनिधित्व केलंय.

हेही वाचा – 

आता गोलंदाजांची खैर नाही! दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या स्फोटक फलंदाजाची सरप्राईज एंट्री
“सचिन-धोनी नाही, तर हा माझा आवडता फलंदाज”; स्मृती मंधानानं केला खुलासा
जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला? संघातील हे महत्त्वाचं पद गेलं, बीसीसीआयच्या निर्णयामुळे खळबळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---