---Advertisement---

दुर्दैवच म्हणायचं अन् काय! फ्री हीट असनूही फलंदाज झाला बाद, पाहा कसं

On: शुक्रवार, नोव्हेंबर 6, 2020 10:03 PM
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना गाठण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामना झाला. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रंगतदार लढत झाली. सोबतच या सामन्यात खूप क्वचित पाहायला मिळणारी एक घटना घडली. ती घटना म्हणजे,’फ्रि हिट असूनही फलंदाज बाद होणे’.

मोईन अली फ्री हीटवर झाला धावबाद

झाले असे की, बेंगलोरच्या डावातील ११व्या षटकात एबी डिविलियर्स आणि ऍरॉन फिंच फलंदाजी करत होते. हैदराबादचा फिरकीपटू शाहबाज नदीम ते षटक टाकत होता. त्याने षटकातील तिसऱ्या चेंडूवर अब्दुल समदच्या हातून फिंचला झेलबाद केले. त्यामुळे बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने पुढे मोईन अलीला फलंदाजीसाठी पाठवले.

पुढे स्ट्राईकवर असलेल्या डिविलियर्सने षटकातील चौथ्या चेंडूवर जोरदार चौकार मारला. परंतु, नदीमचा तो चेंडू पंचांनी नो बॉल असल्याचे घोषित केले. त्यामुळे मोईन अलीला पहिलाच फ्री हिट चेंडू खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली. पण त्याने या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला साधारण शॉट मारला आणि तो एक धाव घेण्यासाठी पळाला. तेवढ्यात हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानने चेंडू पकडला आणि नॉन स्ट्राईकच्या दिशेने फेकला. त्याचा तो चेंडू थेट यष्टीला लागला. त्यामुळे दुर्दैवाने फ्री हीट असूनही मोईन अली धावबाद झाला.

https://twitter.com/ipl2020highlite/status/1324737345539645442?s=20

यापुर्वीही झाले होते असे

महत्त्वाचे म्हणजे, आयपीएलमध्ये कोणता फलंदाज फ्री हिट असतानाही बाद होण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापुर्वी २०१७ साली बेंगलोरच्याच फलंदाजासोबत हा नकोसा प्रसंग घडला होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर केदार जाधव फ्री हीट असूनही धावबाद झाला होता. केदार जाधव आयपीएल २०१७मध्ये बेंगलोर संघाचा सदस्य होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’, रुग्णवाहिकेसाठी रस्ता काढून देणाऱ्या पोलिसाच्या व्हिडिओवर लक्ष्मणकडून कौतूक

दोघांनीही गुरुवारी साजरा केला आपला वाढदिवस, एकाने दाखवला दुसऱ्याला तंबूचा रस्ता

मुंबई इंडियन्सच्या यशाआड झाकलं जातंय कर्णधार रोहित शर्माचं अपयश?

ट्रेंडिंग लेख-

मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गांगुलीने केली ६ प्रतिभावंत खेळाडूंची निवड; पाहा कोण आहेत ते?

आयपीएल २०२०मध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---