संयुक्त अरब अमीरात म्हणचेच यूएई मध्ये आंतरराष्ट्रीय लीग टी-२० ही स्पर्धा नव्याने सुरू होणार आहे. या लीगच्या पहिल्या हंगामासाठी शारजाह वॉरियर्स संघाने इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली याला करारबद्ध केले आहे. मोईन अली व्यतिरिक्त शारजाह संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही प्रमुख खेळाडू खेळणार आहेत. असे असले तरी, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाची चिंता मात्र वाढल्याचे दिसत आहे.
भारतातील आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रीय टी-२० लीग आहे. मात्र, सध्या आयपीएलप्रमाणेच जगातील इतर देश देखील स्वतःची टी-२० लीग आयोजित करत आहेत. सीपीएल, बीबीएल, पीएसएल, बीपीएल, अशा लीग जगभारात खेळवल्या जातात. आता या यादीत दक्षिण आफ्रिकी टी-२० लीग आणि यूएई आंतरराष्ट्रीय टी-२० लीग या दोन लीगही सहभागी झाल्या आहेत. आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी दक्षिण आफ्रिकेच्या लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच यापैकी काहींनी यूएईतील लीगमध्येही संघ खरेदी केले आहेत.
यूएईत खेळवल्या जाणाऱ्या टी-२० लीगमध्ये (UAE International T20 League) एका संघाकडून ९ विदेशी खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतात. शारजाह वॉरियर्स संघाने डेविड मलान, एविन लुईस, मोहम्मद नबी, ख्रिस वॉक्स अशा दिग्गज खेळाडूंना संघात सामील केले आहे. आता या यादीत मोईन अली (Moeen Ali) हे मोठे नावही जोडले गेले आहे. मोईन अली शारजार वॉरियर्ससाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकत असला, तरी सीएसकेसाठी मात्र ही चिंतेची बाब बनली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये सीएसकेने जोहान्सबर्ग सुपर किंग्ज हा संघ खरेदी केला आहे आणि मोठी किंमत मोजून मोईन अलीला संघात घेतले आहे. अशात तो आता शारजाह संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे सीएसकेसाठी हे धोक्याचे संकेत आहेत. यूएईतील लीग आणि दक्षिण आफ्रिकेतील लीग एका वेळी म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात खेळली जाणार आहे. अशात एक खेळाडू एकाच वेळी दोन्ही लीगमध्ये सहभागी होऊ शकणार नाही, हे स्पष्ट आहे. सीसीएकचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही याविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे.
शारजाह वॉरियर्सने आतापर्यंत करारबद्ध केलेले खेळाडू –
मोईन अली, डेविड मालन, एविन लुईस , मोहम्मद नबी, क्रिस वोक्स, नूर अहमद, रहमानुल्ला गुरबाज, नवीन-उल-हक, टॉम कोहलर-कैडमोर, क्रिस बेंजामिन, डैनी ब्रिग्स, मार्क दयाल, बिलाल खान, जेजे स्मिट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आताची लहान पोरंही फाडफाड इंग्लिश बोलतात! तोडक्यामोडक्या इंग्रजीमुळे आझमचं होतंय हसू, तुम्हीही पाहा
कौतुक करावे तितके कमीच! झिम्बाब्वे बोर्डाने भारताविरुद्धची दुसरी वनडे ‘या’ लोकांना केलीय समर्पित
मयंक अगरवालचा बॉल बॉय राहिलेल्या चेतनचे तुफानी शतक, फक्त बाउंड्रींनीच फटकावले ६८ रन्स