एकेकाळी मयंक अगरवाल आणि करुण नायर अशा खेळाडूंना खेळताना पाहून खुश होणारा एलआर चेतन याने आता त्याच खेळाडूंपुढे जबरदस्त प्रदर्शन करून दाखवले आहे. कर्नाटक क्रिकेट बोर्डने आयोजित केलेल्या महाराजा ट्रॉफीमधील एका सामन्यात चेतनने तुफानी शतक ठोकले. कधीकाळी बॉल बॉयची भूमिका पार पाडणाऱ्या चेतनची फलंदाजी पाहून कर्णधार मयंक अगरवाल देखील हैराण झाल्याचे पाहिले गेले.
बेंगलोर ब्लास्टर्स संघासाठी खेळताना एलआर चेतन (LR Chethan) याने शिवमोगा स्ट्राईकर्स संघाविरुद्ध ही खेळी केली. चेतनने अवघ्या ५५ चेंडूत नाबाद १०५ धावा कुटल्या. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर बेंगलोर संघाने हा सामना २५ धावांच्या अंतराने जिंकला. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले. या दमदार प्रदर्शनानंतर अशी आशा आहे की, चेतनचे स्वप्न लवकरच सत्यात अवतरेल.
३ वर्ष केली बॉल बॉय म्हणून नोकरी –
चेतनचे वय सध्या २२ वर्ष आहे आणि त्याचे पहिले लक्ष्य म्हणजे कर्नाटक संघासाठी खेळणे. शिवमोगा संघाविरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या चेतनने क्रिकेट खेळायला सुरुवात काहीशी उशीरा केली, असे म्हटले जाऊ शकते. जेव्हा तो ११ वी मध्ये होता, तेव्हा त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. २०१७ ते २०१९ यादरम्यानच्या काळात तो कर्नाटक प्रीमियर लीग म्हणजेच महाराज ट्रॉफीमध्ये बॉल बॉयची भूमिका पार पाडत होता. त्यावेळी मयंक अगरवाल (Mayank Agarwal) आणि करुण नायर (Karun Nair) अशा खेळाडूंना पाहणे म्हणजे त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती.
Chethan LR!!!!!! Getting to his maiden @maharaja_t20 century with a SIX!
Definitely a star in the making, he's got all the ingredients of a proper T20 opener! ????#MaharajaTrophyT20 pic.twitter.com/bCurbsXMti
— Che-ತನ್ (@Chethan_K_Cult) August 17, 2022
चेतन आता रोहन पाटील आणि मयंक अगरवाल यांच्यानंतर महाराजा ट्रॉफीमध्ये शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. चेतन म्हणाला की, रोहन पाटीलचे शतक पाहिल्यानंतर त्यालाही असेच वाटले की, तो देखील अशी खेळी करू शकतो. त्याने महाराजा ट्रॉफीच्या चालू हंगामात आतापर्यंत २४७ धावा केल्या आहेत आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील तोच आहे. भविष्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर तो स्वतः म्हणाला की, तो क्रिकेट खेळामध्ये उशीरा आला आहे. दुसऱ्या डिवीजनमध्ये खेळतानाच त्याचे वय १६-१७ वर्ष झाले होते. त्याचे पुढचे लक्ष्य हे कर्नाटक संघासाठी खेळणे आहे, असेही तो म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
संगत का असर! पुजाराच्या साथीदाराचे द्विशतक, ११ षटकार आणि १८ चौकारांसह केली मॅरेथॉन खेळी
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या ‘लेडी ब्रिगेड’ची घोषणा; संघात अनेक चकित करणारी नावे