इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी आफ्रिकेचा २११ धावांनी पराभव केला. ऐतिहासिक लॉर्ड मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात जिंकण्यासाठी आफ्रिकेसमोर ३११ धावांचे लक्ष होते, परंतु मोईन अलीच्या जबदस्त गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेचा संघ ११९ धावांवर सर्वबाद झाला.
जो रूटचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ६ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या विजयासह इंग्लंडनने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली अाहे. पुढील सामना ट्रेंट ब्रिज येथे १४ जुलै पासून सुरु होईल.