पाकिस्तान सुपर लीगमध्ये रविवारी (10 मार्च) क्वेटा ग्लॅडिएटर्सनं लाहोर कलंदरचा पराभव केला. या विजयानंतर क्वेटा ग्लॅडिएटर्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दरम्यान, क्वेटा ग्लॅडिएटर्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते आता विविध प्रतिक्रिया देत आहेत.
झालं असं की, कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये एका चाहत्यानं मोहम्मद आमिरला ‘फिक्सर’ म्हटलं. यानंतर हा वेगवान गोलंदाज संतापानं भडकला. मोहम्मद आमिर इथेच थांबला नाही. तो चक्क त्या चाहत्याशी भिडला. यावेळी या दोघांमध्ये ‘तू-तू-मैं’ आणि वादावादी झाली. आमिरनं चाहत्याला, “तु घरून हेच शिकून येतो का?”, असा जाब विचारला.
यानंतर परिस्थिती इतकी बिघडली की शेजारी उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर हे प्रकरण शांत झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडिया वापरकर्ते सातत्यानं कमेंट करून यावर आपला अभिप्राय देत आहेत.
This is very bad yaar pic.twitter.com/4umVPsgQAb
— ٰImran Siddique (@imransiddique89) March 11, 2024
पाकिस्तानचा वेगवान मोहम्मद आमिर 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. त्यानंतर आयसीसीनं त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घातली होती. त्यावेळी 18 वर्षीय आमिरवर सामन्यादरम्यान जाणीवपूर्वक सतत नो-बॉल टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आमिरबरोबर मोहम्मद आसिफ आणि सलमान बट यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मोहम्मद आमिरचा संघ क्वेटा ग्लॅडिएटर्सनं लाहोर कलंदर्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदरनं 20 षटकांत 4 गडी गमावून 166 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक आणि शाहीन आफ्रिदी यांनी लाहोर कलंदरसाठी 50 धावांचा टप्पा गाठला. प्रत्युत्तरात, क्वेटा ग्लॅडिएटर्सनं 20 षटकांत 4 गडी गमावत 169 धावा करत सामना जिंकला. या विजयानंतर क्वेटा ग्लॅडिएटर्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. मात्र हा सामना मोहम्मद आमिरच्या सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओमुळेच जास्त चर्चेत राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
कुस्तीपटू विनेश फोगटनं ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये गोंधळ घातला, जाणून घ्या काय घडलं
मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर विराम, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज विवाह बंधनात अडकला, झिम्बाब्वेमध्ये फिल्मी स्टाइलनं केलं होतं प्रपोज