---Advertisement---

आमिरच्या चेंडूवर फलंदाजाने गुडघ्यावर बसत खेचला चौकार, मग गोलंदाजाने चिडून केलं असं काही

On: बुधवार, जून 16, 2021 6:50 PM
---Advertisement---

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्व स्तरावरील सामन्यांना स्थगिती मिळाली होती. परंतु संसर्ग कमी झाल्याने पुन्हा हळूहळू सामने सुरू करण्यात आले आहेत. यादरम्यान पाकिस्तान सुपर लीग 2021 चा उर्वरित हंगाम युएईमध्ये चालू आहे. यातील 22 वा सामना इस्लामाबाद युनायटेड आणि कराची किंग्स या दोन संघांमध्ये झाला. इस्लामाबाद युनायटेडने हा सामना 8 बळीने जिंकला. दरम्यान एका चौकारामुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आपापसांत भिडल्याचे पाहायला मिळाले.

सामन्यादरम्यान कराची किंग्सकडून बाबर आजमने 54 चेंडूमध्ये 81 धावा काढल्या आणि संघाला 190 धावांवर पोहोचवला. तर इस्लामाबाद युनायटेडकडून इफ्तिकार अहमदने नाबाद 71 धावा बनवल्या. याच्याव्यतिरिक्त कॉलिन मुनरोने 56 चेंडूमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह 88 नाबाद धावा बनवत संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात इफ्तिकार आणि मुनरो यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. तर दुसरीकडे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर एका गोष्टीमुळे क्रिकेटरसिंकाच्या नजरेत आला. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये मोहम्मद आमिर फलंदाजावर राग काढताना दिसत आहे.

https://twitter.com/ZombieCricketer/status/1404531152233238528?s=20

इस्लामाबाद युनायटेडचे पंधरावे षटक चालू असताना गोलंदाज आमिर फलंदाजाला यॉर्कर चेंडू टाकण्याच्या विचारात होता. परंतु त्याच्या हातून हा चेंडू फुलटॉस गेला, ज्यामुळे फलंदाज इफ्तिकार गुडघ्यावर बसत एकदम कडक चौकार मारला. हे पाहून आमिर चिडला आणि इफ्तिकारला काहीतरी बोलताना दिसून आला. त्यानंतर इफ्तिकारनेही आमिरला प्रत्युत्तर दिले. दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत वाद घालताना दिसून आले. दोघांमधील वाद वाढत चाललेला पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला.

पुढे सामना चालू झाला. त्यानंतर इफ्तिकार अहमदने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. याउलट आमिरला पूर्ण डावादरम्यान एकही विकेट मिळाली नाही. त्याने 3.4 षटकात 32 धावा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

कडाक्याचं भांडण! बाउंसर डोक्याला लागल्याने सर्फराजनं दिल्या शिव्या, आफ्रिदीनेही प्रत्युत्तर दिल्यानं पेटला वाद

भारीच! कसोटीत मिताली, गोस्वामीचा ‘मोठा’ विक्रम; कुंबळे, द्रविड, गांगुलीही पडलेत मागे

स्मिथ पुन्हा कसोटीत ‘अव्वल’; विराटला क्रमवारीत फायदा तर विलियम्सनची घसरण, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---