---Advertisement---

फ्लॉप झालेल्या भारतीय क्रिकेटरने घेतली होती पाकिस्तानी क्रिकेटरची मदत, पुढे असे काही केले…

On: शुक्रवार, जुलै 31, 2020 7:25 AM
---Advertisement---

मुंबई । डिसेंबर 2000 मध्ये बीसीसीआयने मोहम्मद अझरुद्दीन यांना सामना फिक्सिंगमध्ये सामील असल्यामुळे त्यांच्यावर क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घातली. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने 2012 मध्ये ही बंदी हटविली होती. ही बंदी हटवल्यानंतर त्यांचे ‘क्रिकेटींग’आयुष्य आता सामान्य झाले आहे. परंतु भारतीय संघाचा माजी कर्णधार म्हणतो की, ‘त्यांच्यावर बंदी का घातली गेली हे खरंच माहित नाही.’

क्रिकेट पाकिस्तान.कॉमला दिलेल्या मुलाखतीत अझर म्हणाले की, ‘जे घडले त्याबद्दल मी कोणालाही दोषी ठरवू इच्छित नाही. मला बंदी का घातली हे मला माहिती नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘बीसीसीआयच्या निर्णयाविरूद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि मला आनंद आहे की 12 वर्षानंतर माझी बंदी हटवण्यात आली. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यानंतर आणि बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिल्याबद्दल मला खूप समाधान वाटले.’

अझर यांनी भारतासाठी  99 कसोटी सामन्यात 6125 धावा आणि 334 वनडे सामन्यात 9378 धावा केल्या आहेत. 2019 मध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील एका स्टॅंडला त्यांचे नाव देण्यात आले.

शंभर कसोटी सामने खेळण्याचा विक्रम पूर्ण न करण्याचे अझर यांना दुःख नाही. ते म्हणाले,”नशीबात जे काही आहे तेच तुम्हाला मिळेल. मला वाटत नव्हते की माझा 99 कसोटी खेळण्याचा विक्रम मोडेल. कारण एक चांगला खेळाडू 100 पेक्षा जास्त कसोटी खेळेल.”

पाकिस्तानचा महान फलंदाज झहीर अब्बास यांनी त्याला खराब फॉर्ममधून बाहेर येण्यास कशी मदत केली आणि नंतर त्याने युनूस खानला त्याच प्रकारे कशी मदत केली हे त्यांनी सांगितले.

‘1989 च्या पाकिस्तान दौर्‍यासाठी माझी निवड होणार नव्हती. कारण मी फारच खराब फॉर्ममध्ये होतो. मला आठवतेय झहीर भाई कराचीमध्ये आमची प्रॅक्टिस पहायला आले होते. मी विचारले की मी लवकर का बाद होत आहे. तेव्हा त्यांनी मला ग्रीपमध्ये थोडे बदलण्यास सांगितले. मीही तेच केले आणि धावा काढण्यास सुरवात केली,’ असे अझर यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---