---Advertisement---

धोनीचे पदार्पण होण्याच्या १५ वर्षांपूर्वीच ‘या’ भारतीय खेळाडूने खेळला होता हेलिकॉप्टर शॉट, बघा व्हिडिओ

On: गुरूवार, मे 13, 2021 9:57 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉटचे नाव ऐकल्यावर आपल्याला केवळ एका व्यक्तीचे नाव आठवते ते म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे. हेलिकॉप्टर शॉट धोनीचा ट्रेडमार्क शॉट म्हणून ओळखला जातो. परंतु आपणास माहित आहे का ,धोनी ज्या हेलिकॉप्टर शॉटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निर्माता म्हणून ओळखला जातो, तो प्रत्यक्षात 1990 मध्येच खेळला गेला होता. हा शॉट इतर कुणीही नाही तर माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन  यांनी खेळला होता.

आपल्या काळात जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाणारे अझरुद्दीन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लूसरच्या चेंडूवर सलग पाच चौकार ठोकले होते. यादरम्यानच अझरुद्दीन यांनी हेलिकॉप्टर शॉटही खेळला होता. पुल शॉटच्या मदतीने पहिला चौकार ठोकल्यानंतर अझरुद्दीन यांनी पुढचा चेंडू सीमारेषाबाहेर पाठविण्यासाठी हेलिकॉप्टर शॉट खेळला. यानंतर पुढच्या तीन चेंडूंमध्ये त्यांनी आणखी तीन चौकार ठोकले. 1990 साली खेळलेल्या या सामन्यात अझरुद्दीन यांनी 77 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी केली होती.

अझरुद्दीन यांची भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना केली जाते. भारताने त्यांच्या नेतृत्वात अनेक अविश्वसनीय सामने जिंकलेले आहेत. 1990 ते 99 या कालावधीत अझर भारतीय कसोटी संघाचे कर्णधार होते.

अझर यांच्या नेतृत्वात भारताने एकूण 47 कसोटी सामने खेळले, त्यात 14 सामने जिंकले आणि 14 सामने गमावले. तसेच 174 एकदिवसीय सामने खेळलेले होते. यात भारताने 90 सामने जिंकले आणि 76 सामने गमावले. 1990 ते 99 या कालावधीत अझर भारतीय एकदिवसीय संघाचे एक यशस्वी कर्णधार होते. त्यांनी 3 विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्वही केले. हा कारनामा करणारे ते पहिले आणि सध्यातरी एकमेव भारतीय कर्णधार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ प्रमुख ३ कारणांमुळे भुवनेश्वर कुमारकडे श्रीलंका दौऱ्यात द्यायला हवे टीम इंडियाचे कर्णधारपद

इरफान पठाणने कंगणा राणावतला घेतले फैलावर, केले ‘असे’ ट्विट

नाव काढल पोरीने! अवघ्या सतराव्या वर्षी शेफाली वर्मा खेळणार ‘ही’ प्रतिष्ठीत स्पर्धा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---