भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची सातत्याने तुलना होत असते. विराट बाबरपेक्षा अधिक अनुभवी असला तरी, बाबरने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. याच विराट व बाबर यांच्या तुलने विषयी भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या विराट व बाबर यांना जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले जाते. सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा व सर्वाधिक शतके विराटच्या नावे आहेत. तर, बाबरने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करत 2022 वर्षाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. याच कारणाने बाबर व विराट यांच्या तुलनेविषयी अझरुद्दीन यांना विचारले असता ते म्हणाले,
“माझ्यासाठी दोन खेळाडूंची तुलना करणे नेहमीच अवघड राहिले आहे. हे दोन्ही खेळाडू एकदम वेगळे आहेत. मात्र, तरीदेखील विराट हा मला थोडासा वरचढ वाटतो. विराटने बाबरच्या सात वर्ष आधी कारकीर्दीला सुरुवात केली आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल.”
विराटच्या एकूण कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 104 कसोटी, 271 वनडे व 115 टी20 सामने खेळताना अनुक्रमे 8119, 12809 व 4008 धावा काढल्या आहेत. यात तब्बल 73 शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे बाबरने आपल्या सात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 47 कसोटी, 95 वनडे व 99 टी20 सामने खेळलेत. यामध्ये त्याच्या नावे अनुक्रमे 3696, 4813 व 3355 धावा जमा आहेत. तर त्याची एकूण आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या केवळ 28 इतकी आहे. त्यामुळे सध्या आकडेवारीचा विचार केल्यास विराटच बाबरपेक्षा सरस असल्याचे दिसून येते.
(Mohammad Azharuddin Said Virat Kohli Better Than Babar Azam)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या खेळपट्टीवर पंड्या भडकला, त्याबाबत कीवी अष्टपैलूचे मत वेगळे; म्हणाला, ‘आम्ही तक्रार करू…’
विश्वचषक विजेत्या संघातील ‘त्या’ चौघी करणार डब्लूपीएल लिलावात छप्परफाड कमाई; पाहा कामगिरी