---Advertisement---

अझरुद्दीन यांना आठवला त्यांचा खास स्कूटर; म्हणाले, ‘तो माझ्यासाठी लक्झरी होता’

On: शनिवार, जून 5, 2021 6:57 PM
---Advertisement---

आजकाल लॉकडाउनमुळे अनेक लोकं, कलाकार, क्रिकेटपटू इत्यादी आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे आपल्या जुन्या आठवणी शेअर करत असतात. भारताचे माजी कर्णधार मोहमद अझहरुद्दीन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत ते अनेकदा त्यांच्या जुन्या आठवणींचे छायाचित्र चाहत्यांच्या भेटीला आणत असतात. नुकताच त्यांनी आपला एक जुना फोटो पोस्ट केला आहे.

मोहम्मद अझहरुद्दीन हे अप्रतिम खेळाडू होते. त्यांनी भारतासाठी कर्णधार म्हणून अनेकदा विजयात मोलाचा वाटा दिला आहे व अनेकदा भारताला विजयी करून दिले आहे.

मोहमद अझहरुद्दीन यांनी शेयर केल्या जुन्या आठवणी
काही दिवसांपूर्वीच अझरुद्दीन यांनी त्यांच्या एका बॅटचा फोटो पोस्ट केला होता व लिहले होते की, ‘हि तीच बॅट आहे, ज्याने त्यांनी त्यांच्या पहिल्या ३ कसोटी सामन्यांत शतक ठोकले होते.’ त्यांनी हेसुद्धा सांगितले होते की, ती बॅट त्यांच्या आजोबानी पसंत केली होती. आता परत अझरुद्दीननी आपल्या चाहत्यांसाठी एक जुनी आठवण शेयर केली आहे व त्या पोस्टला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसादही मिळत आहे.

चला बघूया अझहर यांची जुनी आठवण
अझहर यांनी (अझरुद्दीन) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या जुन्या स्कूटरचे छायाचित्र शेअर केले आहे. त्यांनी त्या छायाचित्राच्या खाली असे लिहिले की, ‘मी याच स्कूटरवर क्रिकेटचा सराव करायला जायचो. जेव्हा कुटुंबीयांनी माझ्यातील क्रिकेटच्या प्रतिभेला ओळखले होते तेव्हा मला ही स्कूटर देण्यात आली होती. त्याकाळी मी या स्कूटरवर सरावासाठी जायचो. मला हे माझ्या सायकलपेक्षा अधिक आरामदायक वाटायचे.’

मोहमद अझहरुद्दीन यांनी भारतासाठी ९९ कसोटी सामने खेळला होते. त्यांनी सुरुवातीच्या ३ कसोटी सामन्यांत ३ शतके झळकवली होती आणि तो विक्रम अजूनपर्यंत कोणीच मोडू शकले नाही.

महत्वाच्या बातम्या

भारतीय संघाचे ‘ठाकूर आणि गब्बर’; शिखर धवनने शेअर केलेला ‘हा’ फोटो जोरदार व्हायरल

एकाच खेळीत कॉनवेने रचलेत विक्रमांचे इमले; धवनचा मोठा पराक्रमही जमीनदोस्त

आयसीसीने घातलेली २ वर्षांची बंदी पूर्ण करुन सनथ जयसुर्या ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यास सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---