---Advertisement---

मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी विराजमान, विरोधकांवर कारवाई

On: सोमवार, जुलै 5, 2021 9:36 AM
---Advertisement---

लोकपाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) दीपक वर्मा यांनी रविवारी (०४ जुलै) मोहम्मद अझरुद्दीन यांना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्षपद पुन्हा बहाल केले आहे. याबरोबरच अझरुद्दीन यांना निलंबित करणाऱ्या अपेक्स कांउसिलच्या पाच सदस्यांवर कारवाई करत त्यांना तात्पुरते अयोग्य ठरवले आहे.

अंतरिम आदेशानुसार न्यायमूर्ती वर्मा यांनी एचसीए अ‍ॅपेक्स कांउन्सिलचे पाच सदस्य, के जॉन मनोज, उपाध्यक्ष आर विजयनंद, नरेश शर्मा, सुरेंद्र अग्रवाल आणि अनुराधा यांना तात्पुरते अपात्र करार केले आहे. या पच सदस्यांनी अझरुद्दीन यांची एचसीएच्या संविधानातील घटनेच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली हकालपट्टी केली होती.

न्यायमूर्ती वर्मा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, अझरुद्दीन विरोधातील तक्रार त्यांच्याकडे पाठविली गेली नव्हती. त्यामुळे अझरुद्दीन यांच्या निलंबनाच्या निर्णयाला कोणतीही अधिकृत मान्यता नाही.

न्यायमूर्ती वर्मा म्हणाले, “अपेक्स काउन्सिल स्वत: असे निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच निवडलेल्या अध्यक्षांना निलंबित करण्यासाठी या पाच सदस्यांनी केलेला ठराव (केला असल्यास) रद्द करतो. याबरोबरच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे आणि त्यांना एचसीएचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई करण्यापासून दूर राहण्याचे आदेश देतो.”

ते म्हणाले, “म्हणूनच मी निर्देश देतो की मोहम्मद अझरुद्दीन हे एनसीएच्या अध्यक्षपदी कायम राहतील. इथून पुढे ही गोष्ट लक्षात ठेवावी की, पदाधिकाऱ्या विरूद्धच्या सर्व तक्रारीचा निर्णय फक्त लोकपालच करतील.”

मॅच फिक्सिंगचा झाला होता आरोप
माजी भारतीय कर्णधार अझहरुद्दीन यांच्यावर 2000 साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. 2012 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाने ती बंदी उठवली होती. मात्र त्यापुर्वीच अझहरुद्दीन यांची क्रिकेट कारकिर्द संपली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

अस्सल चाहता! १३ वर्षांनंतर शहरात आला माही, एका भेटीसाठी पठ्ठ्याने करुन घेतलं ट्रान्सफर

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…

विराट कोहलीचा ८ वर्षांपुर्वीचा मोठा विक्रम धोक्यात, ‘हा’ धुरंधर काढू शकतो मोडीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---