जसजसे टी-20 विश्वचषक 2021 जवळ येत आहे, तसतसे सर्व देश आपापल्या संघांना अंतिम रूप देण्यात व्यस्त झाले आहेत. खेळाडूही संघात स्थान मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या खेळाडूंसोबतही हेच घडत आहे. सीपीएल 2021 मध्ये पाकिस्तानचे खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
सीपीएलमध्ये रविवारी(29 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात गयाना ऍमेझॉन वॉरियर्सकडून खेळणारा 40 वर्षीय पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिजने 59 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली आहे. त्याच्या संघाने उभारलेल्या 166 धावसंख्येत त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. हाफिजने तिसऱ्या विकेटसाठी शेमरॉन हेटमायरसोबत 67 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली.
हाफिजसह भागीदारी दरम्यान हेटमायरने एका टोक लावून धरले होते. हाफिजने या भागीदारीत 32 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. त्याने त्याच्या 70 धावांच्या खेळीदरम्यान 7 चौकार आणि एक षटकार ठोकला.
सीपीएल 2021 मध्ये हाफिजची चांगली सुरुवात झाली नव्हती. त्रिनबागो नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला फक्त 8 धावा करता आल्या होत्या. पण यानंतर, सेंट किट्स नेविस विरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने 31 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या होत्या. या खेळीमुळे त्याला तिसऱ्या सामन्यात सलामीला येण्याची संधी मिळाली आणि याचा फायदा घेत त्याने अर्धशतक झळकावले.
सीपीएल 2021 मध्ये खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये आतापर्यंत हाफिजने 58 च्या जबरदस्त सरासरीने आणि 116 च्या स्ट्राइक रेटने 116 धावा केल्या आहेत. जर त्याचा दमदार फॉर्म कायम राहिला तर आगामी टी-20 विश्वचषकात तो वयाच्या 40 व्या वर्षीही संघासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू म्हणून खेळतांना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पंतकडे इंग्लिश परिस्थितीत खेळण्याचे योग्य तंत्र नाही’, पाकिस्तानी क्रिकेटपटूची बोचरी टीका
स्टुअर्ट बिन्नीने वनडेत केवळ ४ धावा देत घेतल्या होत्या ६ विकेट्स, पाहा व्हिडिओ
अन् आपल्या राग आवरत विराट पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फक्त म्हणाला, ‘हो, धन्यवाद’






