इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याला अवघ्या ३ धावा करता आल्या. तो स्विंग होणाऱ्या चेंडूविरुद्ध फलंदाजी करताना अडचणीत सापडतोय, असे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिसून आले आहे. ज्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने देखील त्याच्यावर जोरदार टीका केली आहे.
रिषभ पंतने या मालिकेत १७.४ च्या सरासरीने अवघ्या ८७ धावा केल्या आहेत. ज्यामुळे अनेक दिग्गजांनी रिषभ पंतच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “पंतकडे या परिस्थितीत खेळण्याचे योग्य तंत्र नाही. ज्याप्रकारे तो प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात असतो, असे करून तो एक दोन मोठ्या खेळ्या खेळू शकतो. परंतु, तो एक यशस्वी कसोटी क्रिकेटपटू होऊ शकत नाही.”(Salman Butt says Rishabh Pant does not has technique to survive in English conditions)
“पंतला थोड धीर ठेऊन खेळावं लागेल, तसच त्याला बचावात्मक शैली विकसित करावी लागेल. त्याच्याकडे भरपूर आक्रमक शॉट आहेत. परंतु, त्याची बचाव करण्याची शैली इतकी मजबूत नाही. मुख्यतः अशा परिस्थितीत. भारत आणि ऑस्ट्रेलिया सारख्या परिस्थितीत तो यशस्वी ठरू शकतो, कारण तिथे चेंडू जास्त स्विंग होत नाही. परंतु, अशा परिस्थितीत जिथे चेंडू जास्त स्विंग होतो, तिथे रिषभ पंतला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.”
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका तीन सामन्यांनंतर आता १-१ च्या बरोबरीत आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. हा सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात रिषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट बिन्नीने वनडेत केवळ ४ धावा देत घेतल्या होत्या ६ विकेट्स, पाहा व्हिडिओ
अन् आपल्या राग आवरत विराट पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फक्त म्हणाला, ‘हो, धन्यवाद’
आयर्लंडने झिम्बाब्वेला नमवत मालिकेत साधली बरोबरी, ‘केविन ओ ब्रायन ठरला’ सामनावीर