---Advertisement---

‘तो अजून शिकत आहे’, भारताच्या माजी दिग्गजाने केली पंतची पाठराखण

On: मंगळवार, जून 21, 2022 8:29 AM
Rishabh-Pant-1
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने टीम इंडियाची धुरा सांभाळली. भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने गमावले, परंतु नंतर जोरदार पुनरागमन केले आणि पुढील दोन सामने जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. मात्र, पाचवा आणि निर्णायक टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. या मालिकेत पंतची फलंदाजी खूपच खराब होती, त्यामुळे त्याच्यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पंतचा बचाव केला. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही पंतला पाठिंबा दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत युवा सलामीवीर इशान किशन आणि दिनेश कार्तिक यांनी शानदार खेळ दाखवला पण कर्णधार रिषभ पंत फ्लॉप ठरला. पंतला मालिकेत ४ डावात १४.५ च्या सरासरीने आणि १०५.४५ च्या स्ट्राईक रेटने केवळ ५८ धावा करता आल्या.

दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पंतचे समर्थन केले आहे. टी२० विश्वचषकासाठी पंत भारतीय संघाचा एक भाग असू शकतो, असे कैफचे मत आहे, परंतु इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेत यष्टीरक्षकाचे फॉर्ममध्ये पुनरागमन महत्त्वाचे ठरेल. कैफ म्हणाला की, “पंत संघात असेल, पण इंग्लंडचा दौरा त्याच्यासाठी महत्त्वाचा असेल. पंतला लवकरात लवकर फॉर्ममध्ये बघायला आवडेल. या वर्षी टी२० विश्वचषकासारखी महत्त्वाची स्पर्धा होणार आहे आणि रिषभ पंतला त्याची सर्वोत्तम कामगिरी बघायची आहे.”

दिल्ली कॅपिटल्समध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केलेला कैफ पुढे म्हणाला की, “पंत अजूनही शिकत आहे, कारण तो २४ वर्षांचा आहे. त्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्हाला चांगले प्रतिभावान खेळाडू हवे आहेत, जे भारतासाठी सामने जिंकू शकतील, असे राहुल द्रविडने सांगितले होते तसेच काहीसे पंतने भारतासाठी हे केले आहे, त्यामुळे त्याला संघ व्यवस्थापनाचाही पाठिंबा मिळाला आहे.”

या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही पंतला खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये संघाचा अविभाज्य भाग म्हणून वर्णन केले होते. पंत आता १ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळवली जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा झटका!, दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण

ENGvsIND: चेतेश्वर पुजारा नाही तर ‘हा’ खेळाडू कॅप्टन शर्मासोबत येणार सलामीला, बीसीसीआयने दिले संकेत

विराटचा फॉर्म कसा येणार माघारी? ग्लेन मॅकग्रांनी दिला मोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---