---Advertisement---

३९ वर्षीय मोहम्मद कैफने पकडला भन्नाट झेल, चाहत्यांना आठवले जूने दिवस!

On: बुधवार, मार्च 11, 2020 4:21 PM
---Advertisement---

मुंबई। भारतात सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज टी२० स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत काल(१० मार्च) इंडिया लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स संघात सामना पार पडला. हा सामना इरफान पठाणने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने ५ विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद कैफने तिलत्करने दिलशानचा शानदार झेल घेतला. सध्या त्याच्या या झेलची चर्चा आहे.

या सामन्यात श्रीलंकेकडून दिलशान आणि रोमेश कालूवितरणा यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सलामीला ४६ धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी तोडण्यात कैफने मोठा वाटा उचलला.

या सामन्यातील ८ वे षटक टाकत असलेल्या मुनाफ पटेलच्या चेंडूवर दिलशान फटका मारण्यास चुकला. चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागून उडाला. यावेळी डीप मीड-विकेटला उभ्या असणाऱ्या कैफने पळत जाऊन शानदार झेल घेतला. त्यामुळे दिलशानला २३ धावांवर विकेट गमवावी लागली.

३९ वर्षीय कैफचा हा झेल पाहुन अनेकांना जून्या दिवसांची आठवण झाली. आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना कैफला त्याच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे नावलौकिक मिळाला आहे. त्याची भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये आजही गणना केली जाते.

 

दिलशान बाद झाल्यानंतर मात्र श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. त्यांच्यातील एकाही फलंदाजाला २५ धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे निर्धारित २० षटकात श्रीलंकेने ८ बाद १३८ धावा केल्या. भारताकडून मुनाफ पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर झहीर खान, मनप्रीत गोणी, संजय बांगर आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर १३९ धावांचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर तसेच युवराज सिंग केवळ १९ धावांमध्ये माघारी परतले.  त्यामुळे पाठलाग करणे कठीण होत होते. पण इरफान पठाणने किल्ला लढवला. त्याने ३१ चेंडूत ५७ धावा केल्या. तसेच त्याच्याबरोबरच कैफने फलंदाजीतही चांगली कामगिरी करताना ४५ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. 

महत्त्वाच्या बातम्या – 

कोरोना व्हायरसमुळे आरसीबीसह आयपीएलला बसणार मोठा धक्का!!

…म्हणून सेहवाग म्हणतो सचिन तेंडूलकरने थकवले!!!

हार्दिक पंड्या तब्बल ६ महिन्यांनंतर पुनरागमनासाठी सज्ज, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---