---Advertisement---

IND vs ENG: हेडिंग्ले कसोटी सामन्यापूर्वी मोहम्मद कैफ यांचा टीम इंडियाला सल्ला, ‘ही’ चूक करू नये!

On: गुरूवार, जून 19, 2025 8:43 PM
---Advertisement---

भारतीय संघ (Indian cricket team) इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवार 20 जून पासून सुरुवात होत आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन वर खूप चर्चा होत आहे. त्या चर्चामध्ये इंडिया ए च्या कर्णधाराचं नाव सामील नाही.

यामध्येच माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफने (Mohmmed Kaif) भारतीय संघाच्या व्यवस्थापनाला मोठी चेतावणी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, टीम इंडिया कडून आधीच एक चूक झालेली आहे. आता त्यांनी लीड्समध्ये कसोटी सामन्याआधी दुसरी चूक करू नये.

भारतीय संघ व्यवस्थापनाने सरफराज खानला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. यामध्येच अभिमन्यू ईश्वरनचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्के मानले जात आहे. याविषयी माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफने सोशल मीडियावर म्हटले आहे. अभिमन्यू ईश्वरनला साई सुदर्शन आधी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात यायला हवे. ईश्वरनच्या 27 प्रथम श्रेणी शतकांसहित 8000 फर्स्ट क्लास धावांचा देखील सन्मान व्हायला हवा. सरफराज खानला बाहेर करून ज्यांनी इंग्लंडमध्ये इंडिया ए साठी धावा केल्या आहेत. निवडकर्त्यांनी चूक केली. त्यांनी ईश्वरनला लीड्स कसोटी सामन्यातून बाहेर ठेवून ती चुक पुन्हा करू नये.

इंडिया ए संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने आतापर्यंत इंग्लंड लायन्स विरुद्ध 80 आणि 68 धावा करून स्वतःला सिद्ध केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने आतापर्यंत 103 सामन्यांमध्ये 48.70 च्या सरासरीने 7841 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत. खूप वेळा त्याने टीम इंडियामध्ये कसोटी संघात पदार्पण करण्याच्या तो जवळ पोहोचला पण त्याला अनेक कारणांमुळे खेळण्याची संधी मिळाली नाही. आता या दौऱ्यावर त्याच्याकडे पदार्पण करण्याची खूप चांगली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---