ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध नजीकच्या सामन्यात केवळ चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर संघाचा कर्णधार मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने तडकाफडकी नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत त्याने याबाबतची घोषणा केली. (Mohammad Nabi Stepped Down As Captain)
— Mohammad Nabi (@MohammadNabi007) November 4, 2022
टी20 विश्वचषकात अफगाणिस्तान संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिली. मात्र, त्यांना एकही सामना जिंकण्यात यश आले नाही. श्रीलंका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी चांगली लढत दिली. तर, आयर्लंड व न्यूझीलंडविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरचा सामन्यात त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला मात्र त्यांना विजय मिळवण्यात थोडक्यात अपयश आले. या प्रभावानंतर कर्णधार मोहम्मद नबी याने सोशल मीडिया पोस्ट करत आपण संघाचे नेतृत्व सोडत असल्याचे म्हटले. त्याने लिहिले,
“आपला विश्वचषकातील प्रवास संपला आहे. आम्हाला अपेक्षित असलेला निकाल लागू शकला नाही. नजीकच्या पराभवामुळे आम्ही बेचैन झालो. मागील एका वर्षापासून विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आमची तयारी एका कर्णधाराला हवी तशी होत नव्हती. मागील काही दौऱ्यांपासून मी, निवडसमिती आणि संघ व्यवस्थापन एकसारखे विचार करू शकत नव्हतो. याच कारणामुळे मी नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र खेळाडू म्हणून मी संघासोबत सदैव राहील. आम्हाला पाठिंबा देणारा चाहत्यांसाठी उत्कृष्ट कामगिरी करू.”
अफगाणिस्तान क्रिकेट मधील सर्वोत्तम खेळाडू असलेल्या नबीने मागील वर्षी टी20 विश्वचषकाआधी संघाचे नेतृत्व स्वीकारले होते. 2021 टी20 विश्वचषकाआधी राशिद खाने नेतृत्व सोडल्यानंतर त्याने ही जबाबदारी आपल्याकडे घेतलेली. यापूर्वी देखील तो संघाचा कर्णधार होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट सूर्या अन् डिविलियर्ससारखे फँसी शॉट्स का खेळत नाही? कारण समजताच तुम्हीही व्हाल कोहलीचे फॅन
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय