भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची अनेकदा तुलना केली जाते. या दोघांनीही त्यांच्या राष्ट्रीय संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे आणि दोघेही संघाचे नेतृत्व करतात. अशात या दोघांमध्ये तुलना केली जाणे स्वाभाविक आहे. परंतु भारत आणि पाकिस्तान संघाच्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये तुलना झाल्याचे क्वचितच पाहायला मिळते. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदने आता दोन्ही संघांच्या यष्टीरक्षक फलंदाजांची तुलना केली आहे.
पाकिस्तानचा प्रशिक्षक आणि माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद (Aqib Javed) एका मुलाखतीत बोलत होता. यावेळी त्याने भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) यांची तुलना केली. मुलाखतीत त्याने रिजवान पंतपेक्षा अधिक चांगला खेळाडू असल्याचे सांगितले. जावेदच्या मते पाकिस्तानी यष्टीरक्षक फलंदाज सामन्याचा शेवट करण्याची जबाबदारी घेतो, तर पंत मात्र सामन्याचा शेवट करताना अनेकदा अपयशी ठरतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जावेद म्हणाला की, “रिजवान सध्या पंतपेक्षा अधिक चांगला खेळाडू आहे. यात काहीच शंका नाहीये की, पंत खूप गुणवंत खेळाडू आहे, पण रिजवान ज्या पद्धतीने जबाबदारी उचलतो, त्याबाबतीत पंत खूप मागे आहे.”
“अनेकदा असे म्हटले जाते की, पंत एक आक्रमक खेळाडू आहे, पण आक्रमकतेचा अर्थ काही मोठे शॉट खेळून विकेट गमावणे नसतो. खेळपट्टीवर टिकून राहणे, लढणे आणि सामन्याचा शेवट करणे असा त्याचा अर्थ असतो,” असेही जावेदने सांगितले.
दरम्यान, मोहम्मद रिजवान आणि रिषभ पंत हे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज आहेत. रिषभ पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि भविष्यातील कर्णधार म्हणून देखील त्याचा अनेकदा उल्लेख केला जातो, तर दुसरीकडे मोहम्मद रिजवान देखील पाकिस्तान संघाचासाठी अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. रिजवानच्या प्रदर्शनात सातत्य दिसले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उलट्या दिशेने धावताना बटलरने हवेत झेपावत चक्क एका हाताने घेतला कॅच, फलंदाजानेही धरलं डोकं
ज्याच्या वेगाचं सर्वत्र कौतूक होतंय, त्या उमरान मलिकबद्दल आरपी सिंगचं वक्तव्य विचार करायला लावणारं