न्यूझीलंड सोबतच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तान संघाने नव्या उपकर्णधाराची निवड केली आहे. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान आता संघाच्या उपकर्णदाराची जबाबदारी सांभाळेल. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानच्या टी-20 संघाचा कर्णधार आहे. आता उपकर्णधार पदाची धुरा मोहम्मद रिजवान याच्या हातात दिली गेली आहे.
मागील वर्षीच्या वनडे विश्वचषकात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. संघ विश्वचषाच्या उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. याच कारणास्तव तत्कालीन कर्णधार बाबर आझम याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तसेच संघाला दोन नवे कर्णधार देखील मिळाले. शान मसूद (Shaan Masood) पाकिस्तानचा नवा कसोटी कर्णधार आहे. तर शाहीन आफ्रिकी (Shaheen Afridi) याच्याकडे टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे. अजूनही एकदिवसीय संघाच्या कर्णधाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच न्यूझीलंडविरुद्धच्या आगाम टी-20 मालिकेत मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) याला उपकर्णधाराची जबाबदारी सोपवली गेली आहे.
शाहीन आफ्रिदी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच कर्णधार म्हणून संघाच खेळताना दिसेल. दुसरीकडे मोहोम्मद रिजवान यापुर्वीही पाकिस्तान संघाचा उपकर्णधार राहिलेला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहीती दिली. (mohammad rizwan named new vice captain of pakistan t20 team)
.@iMRizwanPak has been appointed vice-captain of Pakistan’s T20I team 🚨 pic.twitter.com/0Zu6DcstML
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 8, 2024
शाहीनला टी-20 संघाचा कर्णधार बनवल्यानंतर काहींना बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्न देखील उपस्थित केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही याविषयी नाराजी व्यक्त केली. आशिद आफ्रिदी म्हणाला होता, “रिजवान जितकी मेहनत करतो आणि खेळतानाची त्याची एकाग्रता या गोष्टी मला खुप भावतात. त्याचा सगळ्यात चांगला गुण हा आहे तो कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष न देता पुर्णपणे आपला खेळ कसा चांगला होईल याच्यावर लक्ष देतो. मला त्यालाच टी20चा कर्णधार म्हणून पाहण्याची इच्छा होती पण चुकून शाहिन अफरीदीला ही जबाबदारी देण्यात आली.”
महत्वाच्या बातम्या –
केपटाऊन कसोटीवर दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘त्यांनी केली ती चूक आणि आम्ही…’
भारतीय संघाच्या अडचणीत वाढ! सुर्यकुमार यादवच्या दुखपतीबाबत मोठी अपडेट समोर