पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या ससेक्स संघाकडून इंग्लंडमध्ये काउंटी चँपियनशीप २०२२ खेळत आहे. भारताचा स्टार कसोटीपटू चेतेश्वर पुजाराही याच संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. डरहम विरुद्ध ससेक्स संघाकडून खेळताना पुजारा आणि रिझवानने पहिल्या डावात सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली होती आणि ससेक्स संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले होते. त्यांच्या या भागीदारीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला. दरम्यान रिझवानने एक अद्भुत झेल घेतला, ज्याची भरपूर चर्चा होत आहे.
रिझवानने (Mohammad Rizwan) हवेत सूर मारत एका हाताने हा झेल टिपला (Mohammad Rizwan One Hand Catch) आहे. ससेक्सच्या ३१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डरहमकडून ऍलेक्स लीस आणि सीन डिक्सन यांनी शतकी खेळी केली आणि सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्याच्या शेवटच्या क्षणात यष्टीरक्षक रिझवानने मस्तीसाठी ग्लोव्ह्ज आणि पॅड काढत पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
डरहमच्या दुसऱ्या डावातील १०३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार स्कॉट बोर्थविकने बचावात्मक फटका खेळला. चेंडू बोर्थविकच्या बॅटच्या बाहेरच्या कडेला लागून स्लिपच्या दिशेने गेला, जिथे रिझवान क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. रिझवानने चेंडू आपल्या दिशेला येत असल्याचे पाहताच आपल्या डाव्या अंगाला हवेत उडी मारली आणि सूर मारत एका हाताने भन्नाट झेल घेतला. काही वेळ बोर्थविकलाही आपण बाद झाल्याचा विश्वास बसला नाही. तो रिझवानने झेल पकडल्यानंतरही काही वेळ त्याच्याकडे पाहताना दिसला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Another stunning catch from Superman Mohammad Rizwan #CountyCricket2022 #Cricket pic.twitter.com/54sux2odZD
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) May 1, 2022
बोर्थविकच्या झेलव्यतिरिक्त रिझवानने अजून एक झेल घेतला. यामध्ये डहरमचा सलामीवीर सीन डिक्सनच्या झेलचाही समावेश होता. १८६ धावांवर खेळत असलेल्या डिक्सनला मेसन क्रेनच्या गोलंदाजीवर रिझवानने झेलबाद केले होते. इतकेच नव्हे तर, रिझवानने या सामन्यादरम्यान फलंदाजी, यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षणाखेरीज गोलंदाजीही केली. त्याने २ षटके गोलंदाजी करताना केवळ ५ धावा खर्च केल्या. अशाप्रकारे त्याचे संघाचा पराभव टाळण्यात बरेच योगदान राहिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कॅप्टन कूल’ धोनीच्या संयमाचा बांध तुटला, ज्या खेळाडूने सामना जिंकून दिला; त्याच्यावरच भडकला ‘माही’
धोनीला पुन्हा कर्णधाराच्या रुपात पाहताच चाहत्यांचा उत्साह शिगेला; भविष्याबद्दल ‘कॅप्टनकूल’ म्हणतोय…
‘या’ क्रिकेटरमध्ये टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळवण्याची आहे संधी, स्टेनने दाखवलाय विश्वास