आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (2 मे) गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स व अखेरच्या स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान सामना झाला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, गुजरातचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला.
दिल्लीसाठी सलामीला आलेल्या फिल सॉल्ट याला शमीने पहिल्याच चेंडूवर मिलरच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकात त्याने रायली रूसोला तंबूचा रस्ता दाखवला. तर आपल्या तिसऱ्या षटकात मनीष पांडे व प्रियम गर्ग यांना त्याने बाद केले. या सामन्यात त्याने आपल्या चार षटकांमध्ये केवळ 11 धावा देत 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
या संपूर्ण हंगामात शमी गुजरातच्या विषयी अभियानात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसला आहे. सध्या तुषार देशपांडेसह त्याच्या नावे 17 बळी आहेत. मात्र, उत्कृष्ट इकॉनॉमी रेटमुळे शमीच्या डोक्यावर पर्पल कॅप सजली आहे. शमीने विशेष म्हणजे आपल्या या 17 पैकी 12 बळी त्याने पावर प्लेमध्ये मिळवले आहेत. तर, त्याचा स्ट्राईक रेटही 12.50 आहे.
शमी या प्रदर्शनानंतर आयपीएल इतिहासात पावर प्लेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. शमीने या सामन्यात पावर प्लेमध्ये 7 धावा देत 4 बळी टिपले. याबाबतीत आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा मान ईशांत शर्मा याच्याकडे जातो. त्याने 2011 मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी खेळताना कोची टस्कर्स केरळविरूद्ध 3 षटकात 12 धावा देत 5 बळी मिळवले होते. तर, धवल कुलकर्णीने 8 धावांमध्ये 3 बळी मिळवले होते.
(Mohammad Shami Bowl Second Best Spell In Power Play As Indian In IPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शुबमन गिल हा फिरकीपटूंविरुद्ध खेळणारा मास्टर’, भारताच्या दिग्गज स्पिनरचे मोठे भाष्य
‘मी मागे हटणार नाही, हे माझ्या रक्तात…’, विराटसमोर सव्वाशेर का बनतोय नवीन? घ्या जाणून






