---Advertisement---

शमीच्या खिलाडूवृत्तीला सलाम! प्रतिस्पर्धी असूनही अर्धशतक ठोकल्यानंतर विराटला दिल्या शुभेच्छा

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२२ मध्ये धावा करण्यासाठी झगडताना दिसत होता. हंगामातील ९ सामने खेळूनही त्याला साधे अर्धशतक करता आले नव्हते. मात्र शनिवारी (३० एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हंगामातील आपले पहिलेवहिले अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या अर्धशतकी खेळीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा स्टँड्समध्ये जल्लोष साजरा करताना दिसली. तसेच विरोधी संघाचा खेळाडू मोहम्मद शमी यानेही विराटला शुभेच्छा दिल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

या सामन्यात बेंगलोरचा (RCB vs GT) संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीसाठी आले होते. परंतु फाफ खातेही न खोलता पव्हेलियनला परतला. डावातील दुसऱ्या षटकात प्रदीप सांगवानने त्याला यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर विराटने रजत पाटीदारला साथीला घेत संघाचा डाव पुढे नेला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मोहम्मद शमीने दिल्या विराटला शुभेच्छा
काही आकर्षक फटके मारत विराटने ४५ चेंडूत आपले अर्धशतक (Virat Kohli Half Century) पूर्ण केले. डावातील १३व्या षटकात एक धाव घेत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, मागच्या १४ आयपीएल सामन्यात विराटचे हे पहिले अर्धशतक आहे. हे षटक गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच (Mohammad Shami) टाकत होता. विराटने त्याच्या षटकात अर्धशतक केल्यानंतर शमीने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शुभेच्छा (Mohammad Shami Congratulated Virat Kohli) दिल्या. या २ खेळाडूंमधील हा क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

https://twitter.com/SlipDiving/status/1520360537078788096?s=20&t=m9pPvQhgMpwUdMVs9MZsbA

अनुष्का शर्मानेही साजरा केला जल्लोष
विराटच्या या खेळीमुळे त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) खूपच आनंदात दिसली. मोठ्या काळानंतर विराटने अर्धशतक केल्यामुळे स्टेडियममध्ये आनंदाचे वातावरण बनले. विराटने ५० धावांचा टप्पा पार करताच स्टेडियममध्ये जल्लोष सुरू झाला. स्टॅन्डमध्ये बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला. अनुष्का आनंदाने ओरडताना आणि विराटसाठी टाळ्या वाजवताना देखील दिसली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बड्डे स्पेशल: दक्षिण आफ्रिकेचे ‘भविष्य’ म्हटले जात असलेला ‘मार्को यान्सेन’, वाचा त्याच्याबद्दल क्वचितच माहित असलेल्या गोष्टी

फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११, कर्णधाराचं नाव खूप खास

एक्सप्लोझिव्ह व्हे करंडक स्पर्धा: पीवायसी, डेक्कन जिमखाना, पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---