इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरु झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (३ सप्टेंबर) भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा केला. मात्र, तो या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघाचा भाग नाही. असे असले, तरी त्याचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांनी विशेष बनवला आहे.
झाले असे की शुक्रवारी सामना पाहायला आलेल्या काही प्रेक्षकांनी शमीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खास केक आणला होता. एवढेच नाही तर त्यांनी ‘हॅपी बर्थडे शमी’ असे शब्द लिहिलेले टी-शर्ट देखील परिधान केले होते. त्यांनी दिवसाच्या तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु असताना बाउंड्री लाईन जवळ ड्रिंक्स घेऊन शमी चाललेला असताना त्याचे लक्ष वेधले.
त्यांच्या सततच्या विनंतीला अखेर मान देत शमी त्यांच्या दिशेने गेला. यावेळी त्याने थोडे दूर उभे राहूनच पण, चाहत्यांच्या प्रेमाचा मान राखत केक कापला. याबरोबरच चाहत्यांचे आभार मानले. शमीच्या या कृतीमुळे चाहतेही खूश झाले. सध्या खेळाडू बायोबबलमध्ये असल्याने त्यांना काही गोष्टींबद्दल नियमांचे पालन करावे लागत असल्याने बाहेरील लोकांशी जास्त संबंध ठेवता येत नाहीत.
https://twitter.com/sukhmeet12/status/1433819090695622658
शमीला चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याने याआधी इंग्लंडविरुद्धचे कसोटी मालिकेतील पहिले तिन्ही सामने खेळले असून ११ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच लॉर्ड्स कसोटीत त्याने अर्धशतकी खेळी देखील केली आहे.
Nice gesture from Shami, cutting the cake as he celebrated his birthday with an Indian fan in the ground. pic.twitter.com/t2k5iC26a1
— Johns. (@CricCrazyJohns) September 3, 2021
https://twitter.com/hormone_doc/status/1433811751380963329
चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात बिनबाद ४३ धावा केल्या असून अजून ५६ धावांनी भारतीय संघ पिछाडीवर आहे. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला होता. पहिल्या डावात शार्दुल ठाकूर (५७) आणि विराट कोहली (५०) यांनी अर्धशतके केली होती. तसेच इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा केल्या. त्याच्याकडून ऑली पोपने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर, ख्रिस वोक्सने ५० धावा केल्या भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितचा नवा विक्रम! धोनी, गांगुलीला पछाडत ‘त्या’ विक्रमाच्या यादीत मिळवले ५ वे स्थान
चुकीला माफी नाही! भारत-इंग्लंड सामन्यात सलग तिसऱ्यांदा घुसणाऱ्या जार्वोवर अटकेची कारवाई