---Advertisement---

सेन्सेशनल शमी सामनावीर बनताच झाला भावूक! म्हणाला, “तुम्ही इतके प्रेम करता की…”

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. भारतीय संघाने श्रीलंकेचा केवळ 55 धावांमध्ये खुर्द उडवत 302 धावांनी विजय मिळवला. प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पाच बळी घेत भारताच्या  गोलंदाजीचे नेतृत्व केले. त्याला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर बोलताना तो काहीसा भावूक झाला.

जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी चांगली सुरुवात दिल्यानंतर शमी याने आपल्या गोलंदाजीने कहर केला. आपल्या पहिल्या षटकात त्याने दोन बळी मिळवले. त्याने सामन्यात एकूण पाच बळी मिळवताना केवळ 18 धावा खर्च केल्या. या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर तो म्हणाला,

“आमचे सर्वच गोलंदाज अत्यंत लयीत आहेत. मी प्रत्येक वेळी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो.”

तुझ्या यशाचे श्रेय काय असा प्रश्न संजय मांजरेकर यांनी विचारल्यानंतर तो म्हणाला,

“ज्या प्रकारचा पाठिंबा मला प्रेक्षकांचा मिळतो त्यासाठी मी प्रत्येक प्रेक्षकाचा ऋणी राहील. हे यश तुमचे देखील आहे. भारताबाहेर देखील तुम्ही आम्हाला असेच प्रेम देत असता.”

शमी हा या विश्वचषकात पहिल्या चार सामन्यात सहभागी झाला नव्हता. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच संधी मिळाल्यानंतर त्याने पाच बळी मिळवले. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या मागील सामन्यातही त्याने चार बळी मिळवले होते. या सामन्यात पाच बळी घेताना तो भारतासाठी वनडे विश्वचषक इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने जहीर खान व जवागल श्रीनाथ यांच्या प्रत्येकी 44 बळींचा विक्रम मागे टाकला.

(Mohammad Shami Emotional Say Thanks To Crowd)

महत्वाच्या बातम्या –
जस्सी जैसा कोई नही! पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला दिला दणका
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने आणली धावांची त्सुनामी! विराट-गिलनंतर श्रेयस-जड्डूचा धमाका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---