आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान साउथम्पटन येथील रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा मंगळवारी (२२ जून) पाचवा दिवस असून, या अखेरच्या दिवसाच्या खेळाला पावसामुळे १ तास उशीराने सुरुवात झाली. भारतीय संघाने पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवत सामन्यात पुनरागमन केले. यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे एक मजेदार छायाचित्र व्हायरल झाले, ज्यावर चाहत्यांच्या खुमासदार प्रतिक्रिया आल्या.
शमीचे मजेदार छायाचित्र आले समोर
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील अखेरचे षटक सुरू असताना मोहम्मद शमी सीमारेषेजवळ वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाला. त्याने, एक मोठा टॉवेल घेऊन आपल्या अंगाभोवती गुंडाळला व मैदानाकडे चालू लागला. त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर लगोलग व्हायरल झाली.
Lala 😂#WTCFinal pic.twitter.com/97Axm3M3um
— Saahil Sharma (@faahil) June 22, 2021
चाहत्यांच्या आल्या खुमासदार प्रतिक्रिया
शमीच्या या छायाचित्रावर भारतीय चाहत्यांनी अनेक गमतीदार प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले, ‘शमी भाई, पाच बळी मिळविल्यानंतर काजोलप्रमाणे डान्स करेल.’
Shami bhai doing Kajol Towel dance after taking a 5fer👍👍#NZvIND #WTC21final
— Bumrah is God (@EternalBlizard_) June 22, 2021
दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट करत म्हटले, ‘साउथम्पटन येथे काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असताना खेळाडू आपापले टॉवेल घेऊन मैदानाकडे आले.’
So much rain in Southampton over the last few days is ensuring player carries towel on the field
😉😉😉😅😅#Shami#WTCFinal https://t.co/0LWE8zQ3tQ
— Rohan Gulavani (@ImRohanGulavani) June 22, 2021
Shami using a towel after getting BJ. #WTCFinal pic.twitter.com/YYgIV4j2n6
— Manya (@CSKian716) June 22, 2021
Shami is a funny guy, first he made everyone smile with those excellent wickets and then made us laugh with a new attire. Be like Shami! #WTCFinal #Shami #INDvsNZ pic.twitter.com/DgsEYxZf8T
— Dipen Sharma (@dipensharma1105) June 22, 2021
New dress code for Shami. #INDvNZ pic.twitter.com/RmW6nhlqhC
— Johns. (@CricCrazyJohns) June 22, 2021
शमीची भेदक गोलंदाजी
पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मोहम्मद शमी भारताचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याने या सत्रात तीन पैकी दोन बळी मिळवत भारताच्या मार्याचे नेतृत्व केले. शमीने प्रथमता अनुभवी रॉस टेलरला शुबमन गिलकडे झेल द्यायला भाग पाडत आपला पहिला बळी मिळविला. त्यानंतर, सत्र संपल्यास एक षटक शिल्लक असताना आपला अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या बीजे वॉटलींगला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला त्याने कॉलिन डी ग्रॅंडहोमला पायचीत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला क्रिकेटसाठी मोठा दिवस! पुरुषांच्या मोठ्या सामन्यात महिला पंच करणार पंचगिरी
व्हिडिओ: विराट कोहलीला भर मैदानात वाजली थंडी, रोहितने दिली मजेदार रिऍक्शन
लईच भारी! ‘म्युजिक डे’निमित्त ‘मास्टर ब्लास्टर’ने केला गायक सोनू निगमसोबतचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर