भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आजपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या मालिकेत एक मोठा विक्रम करण्याधी संधी असणार आहे.
आजपासून (४ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम करण्यापासून अवघे काही पाऊल दूर आहे. मोहम्मद शमीने आतापर्यंत भारतीय संघाकडून ५१ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १८४ गडी बाद करण्यात यश आले आहे. जर त्याने या मालिकेत १६ गडी बाद केले तर त्याचा २०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत समावेश होणार आहे. यापूर्वी हा कारनामा अनेक दिग्गज गोलंदाजांनी केला आहे. ज्यामध्ये अनिल कुंबळे यांनी सर्वाधिक ६१९ गडी बाद केले आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु मोहम्मद शमीने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ७६ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते.(Mohammad shami just 16 wickets away to complete 200 wickets milestone in test cricket)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज
अनिल कुंबळे :६१९
कपिल देव :४३४
हरभजन सिंग :४१७
आर अश्विन : ४१३
जहीर खान :३११
ईशांत शर्मा :३०६
बिशन सिंग बेदी :२६६
बीएस चंद्रशेखर: २४२
जवागल श्रीनाथ :२३६
रवींद्र जडेजा :२२१
इरापल्ली प्रसन्ना: १८९
मोहम्मद शमी :१८४
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, आर अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
अय्या! ‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला आवडते आयपीएलची ‘ही’ टीम; खुद्द अभिनेत्रीनेच केलाय खुलासा
‘थाला’चा सीएसके संघ ‘या’ दिवशी युएईला भरणार उड्डाण, सीईओ विश्वनाथन यांनी दिली माहिती
मॅन ऑन मिशन! सूर्यकुमार अन् पृथ्वीची इंग्लंडमध्ये ‘लँडिग’, जाणून घ्या कधीपासून सुरू करणार सराव?