---Advertisement---

‘थाला’चा सीएसके संघ ‘या’ दिवशी युएईला भरणार उड्डाण, सीईओ विश्वनाथन यांनी दिली माहिती

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 11:29 AM
---Advertisement---

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि संघातील खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण यामुळे आयपीएल 2020 चा हंगाम अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. आता 19 सप्टेंबरपासून हंगामातील उर्वरित सामन्यांना यूएईमध्ये पुन्हा सुरुवात होईल. तत्पुर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल संघांना 10 ऑगस्टपासून यूएईला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. अशात एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन यांनी चेन्नई संघ कधी युएईला रवाना होणार याबद्दल माहिती दिली आहे.

विश्वनाथन म्हणाले की, जरी बीसीसीआयने 10 ऑगस्टपासून आयपीएल संघांना यूएईला जाण्याची परवानगी दिली असली; तरीही आमचे संघ व्यवस्थापन युएईला रवाना होण्यासाठी 14 किंवा 15 ऑगस्ट या तारखांचा विचार करत आहे.

पहिला सामना मुंबई इंडियन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल 2021 च्या हंगामातील पहिल्या टप्प्यात 29 सामने झाल्यानंतर काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर आयपीएलचा चालू हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. अलीकडेच हंगामातील उर्वरित सामने खेळवण्यासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे उर्वरित सामन्यांपैकी पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 19 सप्टेंबर रोजी होईल.

इंग्लंडचे खेळाडूही घेणार सहभाग
आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी सर्व संघांसाठी एक खुशखबर आली आहे. स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत इंग्लंडचे खेळाडूही सहभाग घेणार आहेत. इंग्लंडची भारतासोबतची 5 सामन्यांची कसोटी मालिका 14 सप्टेंबरला संपणार आहे. यानंतर इंग्लंडचा बांगलादेश दौरा होता, पण तो आता रद्द झाला आहे. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडूही आता आयपीएलमध्ये खेळू शकणार आहेत. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मॅन ऑन मिशन! सूर्यकुमार अन् पृथ्वीची इंग्लंडमध्ये ‘लँडिग’, जाणून घ्या कधीपासून सुरू करणार सराव?

ENGvIND: अष्टपैलू २ तर वेगवान गोलंदाज ४, टीम इंडियाविरुद्ध ‘असा’ असेल जो रूटचा संघ

“चेतेश्वर पुजारा एक निमित्त आहे, खरे लक्ष्य तर अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढण्याचे आहे”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---