---Advertisement---

“चेतेश्वर पुजारा एक निमित्त आहे, खरे लक्ष्य तर अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढण्याचे आहे”

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 9:27 AM
Virat-Kohli-Cheteshwar-Pujara-Ajinkya-Rahane
---Advertisement---

भारतीय संघाने गेल्या काही महिन्यात चांगली कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गाठला होता. हे सर्व पाहून असे दिसून येत आहे की, भारतीय संघात सर्व सुरळीतपणे सुरू आहे. परंतु माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी अजिंक्य रहाणेबद्दल खलबळजनक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (Sunil Gavaskar Statement on Ajinkya Rahane)

रहाणेला संघाबाहेर करण्याचे अभियान सुरू 
माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन्ही खेळाडूंवर दबाव असणार आहे. संघातील त्यांचे स्थान धोक्यात आहे, जे अत्यंत चुकीचे आहे. दोघांनी मिळून गेली अनेक वर्षे भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या ६ महिन्यात दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. मला असे वाटत आहे की, रहाणे आणि पुजाराला संघाबाहेर करण्यासाठी अभियान राबवले जात आहे.”

अजिंक्य रहाणेवर साधला जात आहे निशाणा
तसेच सुनील गावसकर पुढे म्हणाले की, “मला सांगा, गेल्या ६-८ महिन्यात कुठल्या फलंदाजाने सतत चांगली कामगिरी केली आहे. मुख्य निशाणा अजिंक्य रहाणेवर आहे. या वादात विशिष्ट कारणामुळे पुजाराचे नाव ओढावले गेले आहे. कारण जगाला असे भासू नये की, फक्त अजिंक्य रहाणेवर निशाणा साधला जात आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, रहाणेला एक गुंतवणूक म्हणून समजा, संघासाठी धोका नव्हे. परंतु इथे सर्व उलट होत आहे. तुम्हाला कळालच असेल मला काय म्हणायचं आहे ते?”

“भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा पहिला डाव ३६ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेने शतक झळकावले होते. त्याने ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्याने मायदेशात इंग्लंड संघाविरुद्ध फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर अर्धशतक झळकावले होते. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात देखील अजिंक्य रहाणे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तरी देखील या दोघांवर प्रश्न का उपस्थित केले जात आहे? यामागील खरं कारण काय? यावर अधिक प्रकाश टाकण्याची गरज आहे,” असे सुनील गावसकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

जोडीदारानेच ज्याच्यावर भर मैदानात उगारला होता हात, त्यानेच टी२०त ४ विकेट्स घेत कांगारूंना चारली धूळ

खराब फॉर्मशी झगडत असलेल्या रहाणेला मिळाला गुरुमंत्र, ‘ही’ चूक सुधारल्यास पाडेल धावांचा पाऊस

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली बनू शकतो ‘विक्रमांचा बादशाह’, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---